राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य

Defense Minister Rajnath Singh संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Government’s top priority to ensure national security- Rajnath Singh

राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य- राजनाथ सिंह

देशाच्या सागरी सीमांच्या रक्षणासाठी अद्ययावत शस्त्रप्रणालींनी सज्ज असलेली आधुनिक जहाजं बांधणं ही काळाची गरज – राजनाथ सिंग

मुंबई : भारताच्या सागरी सीमा सुरक्षित आणि संरक्षित राहण्यासाठी अद्ययावत शस्त्रप्रणालींनी सज्ज असलेली आधुनिक जहाजं बांधणं ही काळाची गरज असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज सांगितलं.

Raksha Mantri-Rajnath Singh हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News
File Photo

मुंबईत आज संरक्षण शिपयार्डवरच्या सल्लागार समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाला अधिक सक्षम करण्यासाठी संरक्षण शिपयार्ड महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं ते म्हणाले. संरक्षण शिपयार्डमुळे उत्पादनं वेळेवर पोहोचतात, असंही त्यांनी सांगितलं.

राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याने भारतीय नौदल आणि तटरक्षक दल बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे राजनाथ सिंह यांनी नमूद केले.

भारताच्या संरक्षण शिपयार्डनं विकसित केलेली जहाजांच्या दर्जाबद्दल अनेक देश गौरवोद्गार काढतात, असं सिंग यांनी सांगितलं. नाविक दल आणि तटरक्षक दलाच्या गरजांविषयी जाणून घेण्यासाठी शिपयार्ड त्यांच्याशी सल्लामसलत आणि चर्चा सुरू ठेवतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

“१४ ऑगस्ट २०२० रोजी स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सृजन पोर्टल सुरू करण्यात आले. ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत या पोर्टलवर जहाजबांधणी तळांची ७८३ उत्पादने आहेत, अशी माहिती संरक्षणमंत्र्यांनी दिली.

यापूर्वी या उत्पादनांची आयात केली जात होती आणि त्यांची निर्मिती करणारे स्वदेशातील उत्पादक उपलब्ध नव्हते असे त्यांनी सांगितले. या यादीमधील ७३ उत्पादनांचे यशस्वीरित्या स्वदेशीकरण करण्यात आले आहे आणि इतर उत्पादनांचे या उद्योगातील भागीदारांच्या सहकार्याने स्वदेशीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.

संरक्षण मंत्रालय ३ हजार ७०० उत्पादनं देशात तयार करणार असून हे लक्ष्य गाठण्यासाठी संरक्षण शिपयार्डला महत्त्वाची भूमिका बजावायची आहे, अशी माहिती त्यांनी दिली. देशाच्या अर्थव्यवस्थेतही शिपयार्डचा मोलाचा वाटा असून गेल्या तीन वर्षांत त्यांनी ९ हजार कोटी रूपयांचं उत्पादन मूल्य गाठत एक हजार कोटी रूपयांचा नफा कमावला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संरक्षण शिपयार्डसनी स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहण्यासाठी अद्ययावत रहायला हवं आणि स्वदेशी उत्पादनांच्या निर्यातीवर भर दिला पाहिजे असं ते म्हणाले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *