Crowds of people at tourist places, and religious places welcome the New Year.
नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळ, धार्मिक स्थळी लोकांची गर्दी
मुंबई : राज्यासह देशभरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरु झाली आहे. अनेक नागरिक पर्यटनस्थळी पोहोचले असून इतरांकडे इमारतींमध्ये किंवा नातेवाईकांच्यासोबतीनं वर्षाचा शेवटचा दिवस साजरा करण्याची तयारी सुरू आहे.
नव वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यांना मोठी पसंती दिल्याचं दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही नववर्षाच्या स्वागतासाठी तयारी होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत ११ हजाराहून जास्त पोलीस तैनात केले आहेत.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी केलेली गर्दी लक्षात घेऊन, मुंबईत बेस्ट उपक्रमानं विविध भागात ५० ज्यादा बस गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटकांचं मुख्य आकर्षण असलेली खुली डबल डेकर बस ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून १ जानेवारीच्या पहाटेपर्यंत चालवली जाणार आहे.
hadapsarinfomedia@gmail.com