चांदणी चौक येथील वाहतूक काम पूर्ण होईपर्यंत दररोज रात्री अर्ध्या तासासाठी बंद राहणार

National Highways Authority राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Traffic at Chandni Chowk will be closed for half an hour at night

चांदणी चौक येथील वाहतूक रात्री अर्ध्या तासासाठी बंद राहणार

पुणे : मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील एनडीए चौकातील (चांदणी चौक) दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यासाठी व नवीन पुलाच्या कामासाठी खडक फोडण्याचे काम सुरू असून १० ऑक्टोबरपासून काम पूर्ण होईपर्यंत दररोज मध्यरात्री १२.३० ते १.०० वाजेपर्यंत अर्ध्या तासासाठी चांदणी चौक येथील सर्व बाजूची वाहतूक बंद राहणार आहे.

National Highways Authority राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News
Image Source
https://en.wikipedia.org/

सद्यस्थितीत जुन्या पुलाच्या ठिकाणी साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या तीन लेन व मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या साडे चार लेन उपलब्ध करून देण्यात आल्या असून चांदणी चौक भागातील वाहतूक कोंडीची समस्या काही अंशी कमी झाली आहे.

वाहतुकीच्या बदलाची नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस.एस. कदम यांनी केले आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *