Train services will resume at Nandgaon and Lasalgaon stops from August 14
नांदगांव आणि लासलगाव थांब्यावर १४ ऑगस्टपासून रेल्वेसेवा पूर्ववत सुरू होणार
नाशिक: नाशिक जिल्ह्यात रेल्वेच्या नांदगांव आणि लासलगाव थांब्यावर १४ ऑगस्टपासून रेल्वेसेवा पूर्ववत सुरू होणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी ही माहिती दिली.
कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या काळात रेल्वे प्रशासनानं अनेक रेल्वे गाड्यांचे थांबे रद्द केले होते. त्यात महानगरी, गोरखपूर आणि कामयानी एक्सप्रेस या गाड्यांचा नांदगाव आणि लासलगाव इथो थांब्याचाही समावेश होता.
पण आता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या रेल्वे गाड्यांचा नांदगांव आणि लासलगाव इथला थांबा मंजूर केला असल्याचं त्यांनी सांगितलं.
१४ ऑगस्टला सकाळी ११ वाजता रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवला जाणार असल्याचंही डॉ. पवार यांनी सांगितलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com