Training by BARTI to eligible candidates for Central Public Service Commission personality test
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या व्यक्तिमत्व चाचणीसाठी पात्र उमेदवारांना बार्टीतर्फे प्रशिक्षण
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) संस्थेमार्फत संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा (UPSC) व्यक्तिमत्व चाचणी २०२१ (Personality Test 2021)साठी पात्र उमेदवारांना आर्थिक सहाय्य व ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अधिकाधीक पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टी संस्थेमार्फत करण्यात आले आहे.
बार्टी संस्थेने यु.पी.एस.सी. (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२० च्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेच्या तयारीसाठी ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन दिले होते.
ऑनलाईन मार्गदर्शनाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे उमेदवारांना मुलाखतीमध्ये चांगले यश मिळाले. उपक्रमात सहभागी २३ उमेदवारांपैकी १० उमेदवारांना यू.पी.एस.सी.(UPSC) परीक्षेत यश प्राप्त झाले.
गतवर्षीप्रमाणे व उमेदवारांच्या मागणीनुसार यावर्षीही सनदी अधिकारी व तज्ज्ञ मार्गदर्शक यांच्याकडून व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.
बार्टीमार्फत संघ लोकसेवा आयोग- नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी २०२१ साठी उमेदवारांना एकरकमी २५ हजार रूपयाचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
याबाबत सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज बार्टी संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी http://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यवी, असे आवाहनही बार्टीमार्फत करण्यात आले आहे.
Hadapsar News Bureau