Transfers of senior police officers in Maharashtra
महाराष्ट्रात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
अपर पोलीस महासंचालक दहशतवाद विरोधी पथकाचे सदानंद दाते यांची पदोन्नती होऊन पोलीस महासंचालकपदी नियुक्ती
मुंबई : राज्यभरातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या गृह विभागाकडून बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच, काहींची पदोन्नती देत बदली करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.
छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे पोलीस सहआयुक्त मनोज लोहिया यांची बदली करण्यात आली आहे. शिवाय, ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
राज्याच्या पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक श्रेणीतील पदांवर राज्यातल्या अधिकाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून विविध पदावर त्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.
यामध्ये अपर पोलीस महासंचालक दहशतवाद विरोधी पथकाचे सदानंद दाते यांची पदोन्नती होऊन पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर ठाणे शहर पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांची पदोन्नती करण्यात आली आहे.
आर्थिक गुन्हे विभागाचे अप्पर पोलीस महासंचालरक बिपीन कुमार सिंह यांची पदोन्नती होऊन मुंबईच्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक श्रेणीत बृहनमुंबई, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे शहर, ठाणे शहर, नांदेड इत्यादी ठिकाणच्या अपर पोलीस आयुक्तांची पदोन्नती झाली असून त्यांची विविध ठिकाणी पदस्थापना करण्यात आली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक श्रेणीतील पदावर पदोन्नती देण्याकरिता निवड सूची २०२३ तयार करण्यात आली आहे. १२ जणाची निवड सूची तयार करण्यात आली आहे.
राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान याचवेळी छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन यांची देखील बदली करण्यात आली आहे. मल्लिकार्जुन यांची मुंबई विशेष पोलीस पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी आता बृहन्मुंबई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त डी.एस. चव्हाण यांच पदोन्नती होऊन बदली करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे संभाजीनगरचे नवीन पोलीस आयुक्त मनोज लोहिया आणि नव्याने छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदलून आलेले डी.एस. चव्हाण या दोघांनी शहर पोलिसात यापूर्वी एसीपी म्हणून काम पाहिलेले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com