Travel time from Delhi to Mumbai will be reduced to 12 hours – Nitin Gadkari
दिल्ली ते मुंबई प्रवासाचा वेळ १२ तासांपर्यंत कमी होणार – नितीन गडकरी
नवी दिल्ली : तंत्रज्ञानआणि हरीत इंधनात वेगानं प्रगती झाली तर इलेक्ट्रिक ऑटोमोबाईवरचा खर्च कमी होऊन येत्यादोन वर्षांत तो पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या बरोबरीला येईल असं केंद्रीय रस्त वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत सांगितलं.
ते रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या २०२२-२३ च्या अनुदान मागण्यांवरच्या चर्चेला उत्तर देत होते. देशानं किफायतशीर स्वदेशीइंधनाकडे वळण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. दिल्ली ते मुंबई दरम्यानच्या दळणवळणातसुधारणा होऊन प्रवासाचा वेळ १२ तासांपर्यंत कमी होईल, आणि यासाठीचंकाम येत्या वर्षभरात पूर्ण होईल असं ते म्हणाले. गडकरी म्हणाले आणि या वर्षभरात हेकाम पूर्ण होईल, असेही गडकरी म्हणाले.
श्रीनगरहून मुंबईला २० तासात पोहोचता यावंयासाठीही मंत्रालयात या वर्षअखेरपर्यंत उपाययोजना करेल असं त्यांनी सांगितलं.
नागरी उड्डाणमंत्रालयाच्या अनुदानाच्या मागणीवरही आज लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली. काँग्रेसचे रवनीत सिंग बिट्टू यांनी चर्चेला सुरुवात केली.भारतीय विमानतळ प्राधिकरणाने ऑक्टोबर २०१६ पासून सुरु केलेल्या ९४८ मार्गांपैकी डिसेंबर२०२१ पर्यंत केवळ ४०५ मार्गच कार्यरत होते अशी टीका त्यांनी केली.
देशात ३० ते ४० हरीतक्षेत्रविमानतळं तयार व्हायला हवीत असं भाजपचे राजीव प्रताप रुडी म्हणाले. प्रचंड खर्च केलातरीदेखील सध्याच्या विमानतळांची क्षमता एका मर्यादेपेक्षा वाढवता येणार नाही असं त्यांनीस्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनीही या चर्चेत भाग घेतला. पुणेविमानतळावर मोठ्या विमानांना उतरता यावं यासाठी या विमानतळाचा विस्तार करावा अशी मागणीत्यांनी केली.
Hadapsar News Bureau