Tribute to Bharat Ratna Pandit Bhimsen Joshi
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना सुरांतून अभिवादन
ज्येष्ठ गायक पंडित मिलिंद चित्ताल यांचे गायन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरुकुल) व भीमसेन जोशी अध्यासनाद्वारे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ गायक पंडित मिलिंद चित्ताल (पं. फिरोज दस्तूर यांचे शिष्य) यांच्या शास्त्रोक्त गायनाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करण्यात आले होते. या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना अभिवादन करण्यात आले.
पंडितजींच्या जयंतीनिमित्त विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमात आरंभी विख्यात गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या षष्ट्यब्दीनिमित्त त्यांचा सन्मान विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या माजी विभगप्रमुख डॉ.शुभांगी बहुलीकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विभागप्रमुख डॉ.प्रवीण भोळे, प्राध्यापक डॉ.चैतन्य कुंटे हेही उपस्थित होते. विभागात गुरु म्हणून कार्यरत असलेल्या पं. पद्माकर थत्ते यांच्या स्मृतीनिमित्त थत्ते कुटुंबियांकडून ‘पं. पद्माकर थत्ते स्मृति शिष्यवृत्ती पुरस्कार’ दिला जातो. यंदाच्या वर्षी होनराज मावळे या विद्यार्थी कलाकाराला हा शिष्यवृत्ती-पुरस्कार देण्यात आला.
यानंतर पंडित मिलिंद चित्ताल यांनी आपल्या सरांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांना भरत कामत (तबला), डॉ. चैतन्य कुंटे (हार्मोनिअम), होनराज मावळे यांनी साथसंगत केली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com