तुर्कस्तान आणि सीरियातल्या भूकंपात मृत्यू झालेल्या संख्या ५ हजारांपेक्षा जास्त

6.0 magnitude earthquake hits Kathmandu नेपाळच्या काठमांडूमध्ये ६.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Death toll in Turkey and Syria earthquakes exceeds 5,000

तुर्कस्तान आणि सीरियातल्या भूकंपात मृत्यू झालेल्या संख्या ५ हजारांपेक्षा जास्त

भूकंपग्रस्त भागातल्या शोध आणि बचाव मोहिमेसाठी भारतानं आणखी दोन पथकं रवाना केली

6.0 magnitude earthquake hits Kathmandu नेपाळच्या काठमांडूमध्ये ६.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
Image by Shutterstock.com

तुर्की आणि सिरियात काल झालेल्या शक्तिशाली भूकंंपातल्या मृतांची संख्या ५ हजार झाली आहे तर हजाराहून अधिक जखमी झाले आहेत. बचाव कार्य सुरू असल्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. गोठवणारी थंडी, उद्ध्वस्त झालेले रस्ते आणि इंटरनेटचं खराब झालेलं जाळं यामुळे शोध कार्यात अडथळे येत आहेत. तुर्कीत सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलेला आहे.

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष सिसेप तय्यिप इर्दोगन यांनी देशातल्या १० प्रांतात तीन महिन्यांची आणीबाणी लागू केली आहे. ७० राष्ट्रांनी मदत देऊ केल्याचंही त्यांनी मुलाखतीत सांगितलं. एक कोटी ३५ लाख नागरिक या भूकंपामुळे प्रभावित झाले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. मदत घेऊन गेलेली भारताची पहिली तुकडी तिथं पोहोचली आहे.

दरम्यान तुर्कीत भूकंपग्रस्त भागातल्या शोध आणि बचाव मोहिमेसाठी भारतानं आणखी दोन पथकं रवाना केली आहेत. एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलातल्या १०१ कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. या दोन पथकांसोबत विशेष प्रशिक्षित श्वान पथकं आणि सर्व आवश्यक ती उपकरणं पाठवण्यात आली आहेत. या पथकांचं नेतृत्व कमांडंट गुरमिंदर सिंग करत असून त्यात डॉक्टर आणि इतर निमवैद्यकीय लोकांचा समावेश आहे. केंद्र सरकार संकटकाळात तुर्की सरकारला सर्व ते साह्य करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं गृह मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *