सुमारे २०० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी दोन व्यक्तींना अटक

Two arrested in GST scam worth around Rs 200 crore

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कर चुकविणाऱ्‍यांविरूद्ध विशेष मोहीम; सुमारे २०० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी दोन व्यक्तींना अटक

मुंबई :  खोटी बिले देऊन शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत हिरालाल जैन व  प्रमोद कातरनवरे या दोन व्यक्तींना महाराष्ट्र वस्तू व सेवाकरLogo GST Govt of Maharashtra विभागाने करचुकवेगिरी साठी १६ मार्च २०२२ रोजी अटक केली आहे.

खोटी बिले देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी करणाऱ्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मे.टेस्को इम्पेक्स आणि मे. पारसमणी ट्रेडर्स या प्रकरणांमध्ये अन्वेषण भेट देण्यात आली होती.

टेस्को इम्पेक्सचे मालक प्रमोद कातरनवरे आणि पारसमणी ट्रेडर्स या कंपनीचे मालक गणेश काकड  हे कोणताही व्यवसाय करीत नाहीत. दोन्ही प्रकरणांमध्ये वस्तूंच्या पुरवठ्याशिवाय १९७ कोटी रुपयांची बनावट बीजक देऊन आणि २९ कोटी रुपयांचा वस्तू व सेवाकर त्यांच्या प्राप्तकर्त्यांना स्थानांतरीत करून २९ कोटी रूपयांची बनावट वजावट मिळवून दिली आहे. म्हणूनच दोन्ही करदात्यांनी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७ च्या तरतुदींचे उल्लंघन करून वस्तूंचा पुरवठा न करता बिजक किंवा बिले जारी करुन शासनाची महसूल नुकसान केले आहे.

या दोन्ही प्रकरणांमध्ये हिरालाल जैन हे कर्ताधर्ता असून प्रमोद कातरनवरे हे ही महसूल  नुकसानीमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे  हिरालाल जैन व  प्रमोद कातरनवरे या दोन व्यक्तींना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरीसाठी १६ मार्च २०२२ रोजी अटक केली आहे.

या व्यक्तींचे कृत्य हे दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा असून वस्तू व सेवाकर कायदा २०१७ नुसार तुरूंगवासास पात्र आहे. या दोन्ही व्यक्तींना मा. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने दि. २८ मार्च २०२२ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *