Two passengers carrying cocaine from Ethiopia were intercepted at the Mumbai airport
इथिओपियाहून कोकेन घेऊन जाणाऱ्या दोन प्रवाशांना मुंबई विमानतळावर रोखले
इथिओपिआहून मुंबई विमानतळावर आलेले दोन प्रवासी अंमली पदार्थ वाहतुकीसंदर्भात महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या ताब्यात
मुंबई : इथिओपिअन एअरलाईन्सचे विमान ईटी-640 ने प्रवास करून अडीस अबाबा इथून 3 डिसेंबर 2022 रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या दोन प्रवाशांना अंमली पदार्थाची वाहतूक केल्याबद्दल ताब्यात घेतले.
महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या(Directorate of Revenue Intelligence) मुंबई विभागाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
या प्रवाशांकडे असलेल्या चार रिकाम्या बॅगा फाडून तपासल्या असता प्रत्येक बॅगेतून पांढरी पूड भरलेल्या दोन अशा एकून आठ प्लास्टिकच्या पिशव्या आढळल्या. तपासणीअंती ही पूड कोकेन असल्याचे स्पष्ट झाले. 1985 च्या अंमलीपदार्थ कायद्यानुसार कोकेनवर बंदी आहे.
हे दोन्ही प्रवासी परदेशी नागरीक असून त्यांतील 27 वर्षीय पुरुष केनियाचा नागरीक आहे व 30 वर्षीय महिला गिनीची नागरीक आहे.
पुरुष प्रवासी विदूषक म्हणून काम करतो व महिला प्रवासी महिलांसाठीच्या कपडे उद्योगात कार्यरत आहे. या दोघांकडे कोकेनची 1794 ग्रॅम पूड मिळाली असून त्याची काळ्या बाजारात किंमत जवळपास 18 कोटी रुपये इतकी आहे. भारतातील संभाव्य गिऱ्हाईकांबाबत त्यांची चौकशी सुरू आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com