Uddhav Thackeray’s appeal to break the walls of Marathi-Amrathi divide and come together
मराठी-अमराठी भेदाच्या भिंती तोडून सर्वांनी एकत्र येण्याचं उद्धव ठाकरे यांचं आवाहन
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज उत्तर भारतीय मेळाव्याला संबोधित केले. जर तुम्ही स्वतःला खरे हिंदू समजत असाल तर तुम्ही माझे आव्हान स्वीकारून दाखवा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना निवडणुका घेण्याचे आव्हान केले आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मराठी-अमराठी भेदाच्या भिंती तोडत आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत केलं. गोरेगाव इथं आयोजित उत्तर भारतीय मेळाव्यात उद्धव ठाकरे सहभागी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मन की बातवरुन टोला लगावला आहे. उत्तर भारतीयांशी सेनेचं नातं मजबूत करण्यासाठी मी आलो, असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. उत्तर भारतीयांचा मेळावा नसू ही बैठक आहे. मेळाव्याला मैदान कमी पडेल, असं ठाकरे म्हणाले. लोकांना आता मन की बात नको असून दिल की बात हवीय, असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लगावला.
संपूर्ण देशाला भाजपचं हिंदुत्व काय हे समजून घ्यायचं आहे. आम्ही भाजपशी २५-३० वर्ष राजकीय मैत्री निभावली, पण आम्हाला काय मिळालं. भाजपवाले केंद्रात सत्तेत बसल्यावर त्यांना ज्यांनी तिथपर्यंत पोहोचवलं मग अकाली दल असो आणि शिवसेना त्यांना नकोसे झाले.भाजपचे वाईट दिवस होते त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना वाचवलं होतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मेळाव्याला संबोधित करताना ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर कडाडून टीका केली. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवण्याचं आव्हान ठाकरे यांनी केलं. याच मेळाव्यात ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्ववादी धोरणावर टीका करत ते ब्रिटिशांचं तोडा-फोडा आणि राज्य करा या नितीचा अवलंब भाजपनं केल्याचा टोला ठाकरे यांनी लगावला. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. आज ज्या प्रकारे ते हिंदुत्वाचं प्रचार करत आहेत ते खरं हिंदुत्व नसल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com