Uddhav Thackeray’s criticism that BJP is trying to take the country to a single umbrella regime
देशाला एकछत्री राजवटीकडे नेण्याचा प्रयत्न भाजपा करत असल्याची उद्धव ठाकरे यांची टीका
मुंबई : देशाला एकछत्री राजवटीकडे नेण्याचा प्रयत्न भाजपा (BJP) करत असल्याची टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी कालच्या भाषणात त्याची पुष्टी केली आहे. वेळीच ह्यांचा डाव ओळखावा लागेल. तो पूर्ण होऊ द्यायचा का? असा सवाल ठाकरे यांनी केला.
शिवसेनेला (Shiv Sena) संपवण्याचा प्रयत्न तरी करून पाहा, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला आव्हान दिले आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केलेल्या भाषणावर त्यांनी टीका केली.
दिवस फिरले की तुमचे काय होईल याचा विचार भाजपने करावा असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. भाजपकडून प्रादेशिक पक्षांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
लोक भाजपात जात आहेत. पण यांना त्यांना गुलाम बनवायचं आहे. सत्तेचा फेस गेल्यावर ते कळेलच, अशी टीका त्यांनी फुटीर आमदारांवर केली. संजय राऊत यांच्या अटकेबाबत ते म्हणाले, की राऊत झुकले नाहीत. संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्याबाबत मला अभिमान आहे असेही, ते म्हणाले. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राऊत पत्रकार आहेत, निर्भिड आहेत. लोकशाहीच्या चौथा स्तंभातल्या एकाला अटक केली आहे. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. राजकारण हल्ली घृणास्पद झाल्याची टीका त्यांनी केली.
राऊत यांना न्यायालयात आज हजर करण्यापूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. राऊत यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, राऊत यांची पत्नी, मुलींना शिवसेना खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे असल्याचा विश्वास दिला. उद्धव ठाकरे यांनी यानंतर मातोश्रीवर जाऊन पत्रकार परिषद घेत भाजप सह शिंदे गटाचा समाचार घेतला.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com