संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर

United Nations Logo

UN Secretary-General Antonio Guterres to arrive on a 3-day visit to India

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर भारतात येणार आहेत. या वर्षी जानेवारीत दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस गुटेरेस हे मुंबईत हॉटेल ताजमहाल पॅलेस येथे २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली अर्पण करून भारत दौऱ्याची सुरुवात करतील. United Nations Logo

ते IIT मुंबई येथे भारत @75: UN-भारत भागीदारी: दक्षिण-दक्षिण सहकार्य मजबूत करणे यावर देखील संबोधित करतील.

अँटोनियो गुटेरेस या महिन्याच्या २० तारखेला गुजरातमधील केवडिया येथे मिशन LiFE (पर्यावरणासाठी जीवनशैली) पुस्तिका, लोगो आणि टॅगलाइन लॉन्च करताना पर्यावरणपूरक जीवनशैली याविषयीच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सहभागी होतील.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस गुटेरेस स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पुष्पहार अर्पण करतील अशी अपेक्षा आहे. ते भारतातील पहिले सौरऊर्जेवर चालणारे गाव आणि गुजरातमधील मोढेरा येथील सूर्य मंदिरालाही भेट देतील.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले की परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर अँटोनियो गुटेरेस यांच्याशी G20 चे भारताचे आगामी अध्यक्षपद आणि सुधारित बहुपक्षीयतेसह अनेक मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा करतील.’

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *