संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची उद्या मुंबईत विशेष बैठक

United Nations Security Council संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

A special meeting of the UN Security Council’s Counter-Terrorism Committee will be held in Mumbai tomorrow

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची उद्या मुंबईत विशेष बैठक

दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी उपाय सुचवण्याकरता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तदर्थ समितीची बैठक मुंबईत होणार

मुंबई : आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला दहशतवादापासून सर्वाधिक गंभीर धोका असल्याचं भारतानं म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची विशेष बैठक उद्या आणि परवा मुंबई आणि दिल्लीत होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांसाठी भारताच्या स्थायी प्रतिनिधी आणि समितीच्या अध्यक्ष रूचिरा कंबोज यांनी वार्ताहरांसमोर काल हे निवेदन दिलं.United Nations Security Council संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

दहशतवादी कारवायांसाठी नव्या तंत्रज्ञानाच्या वापराचा मुकाबला ही या बैठकीमागची संकल्पना आहे. तसेच या बैठकीत विद्यमान आणि विकसित होणारे धोके, त्या धोक्यांचा सामना करण्यासाठी नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर, सतत आव्हाने आणि चांगल्या पद्धती, तसेच संबंधित मानवी हक्क आणि लैंगिक विचारांची श्रेणी यावर चर्चा करण्याची संधी मिळेल.

सदस्य राष्ट्रांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही गेल्या वीस वर्षात दहशतवादाचा धोका कायम असल्याचं त्या म्हणाल्या. समाजमाध्यमांसह इंटरनेट, आर्थिक व्यवहारांसाठीचं नवीन तंत्रज्ञान, पैसा मिळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती आणि ड्रोनसारख्या मानवविरहीत पद्धतींचा वाढता वापर दहशतवादी करत असल्यामुळे त्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर या बैठकीत भर दिला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

या बैठकीला ब्रिटनचे परराष्ट्र सचिव जेम्स क्लेव्हर्ली हे परराष्ट्र मंत्र्यांमध्ये सहभागी होणार आहेत

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

One Comment on “संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची उद्या मुंबईत विशेष बैठक”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *