Unauthorized seizure of foreign currency and gold from passengers by Directorate of Revenue Intelligence
महसूल गुप्तचर संचालनालयाकडून प्रवाशांकडून विनापरवाना परकीय चलन आणि सोनं जप्त
मुंबई विमानतळावर 10.16 कोटी रुपयांच्या तस्करीच्या सोन्यासह 18 सुदानी महिलांना अटक
मुंबई : संयुक्त अरब अमिरातीहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांकडून महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजेच DRI च्या अधिकाऱ्यांनी विनापरवाना आणलेलं परकीय चलन, अतिरिक्त भारतीय चलन तसंच सोनं जप्त केलं.
मिळालेल्या खबरीनुसार मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर संचालनालयाच्या चमूनं पाळत ठेवून 16 किलोहून जास्त सोनं आणणाऱ्या प्रवाशांना पकडलं. त्यांनी तीन फ्लाइटमधील संशयित प्रवाशांना ओळखले आणि त्यांना रोखले. त्यांची कसून तपासणी केली . डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जप्त केलेले बहुतेक सोने तस्करांच्या शरीरात लपवून ठेवलेले आढळले होते, त्यामुळे ते शोधणे अत्यंत कठीण होते.
काही सोनं प्रवाशांच्या अंगावर पेस्ट स्वरुपात लपवलेलं होतं, तर काही सोन्याचे छोटे तुकडे किंवा दागिन्यांच्या रुपात सापडलं. याची एकूण किंमत अंदाजे 10 कोटींहून जास्त आहे.
तपासणीनंतर अजून 85 लाख किंमतीचं 1 किलो 85 ग्रम सोनं, विनापरवाना आणलेलं 88 लाखांचं भारतीय तसंच 16 लाखांचं परकीय चलन डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी हस्तगत केलं.
या प्रकरणी 18 सुदानी महिला आणि त्यांचा भारतीय म्होरक्या यांना DRI च्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे.
देशात सोन्याच्या बेकायदेशीर प्रवाहासाठी जबाबदार असलेल्या सिंडिकेटमध्ये सामील असलेल्या व्यक्तींची संपूर्ण साखळी उलगडण्यासाठी पुढील तपास प्रगतीपथावर आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com