Under the leadership of the Prime Minister, many measures were taken for the welfare of the Scheduled Castes and Scheduled Tribes – Gaurav Bhatia
प्रधानमंत्रींच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती आणि जमातींच्या कल्याणासाठी अनेक उपाययोजना केल्या – गौरव भाटिया
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं अनुसूचित जाती आणि जमाती अंतर्गत येणाऱ्या समाजाच्या कल्याणासाठी अनेक उपाययोजना केल्या असं भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी म्हटलं आहे.
ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यापासून या वर्गातल्या नागरिकांना मुख्य प्रवाहाशी जोडायचं ध्येय समोर ठेवलं आहे असं त्यांनी सांगितलं.
या समाजातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची अर्थसंकल्पीय तरतूद केली गेली. यासोबतच एकलव्य मॉडेल स्कूलवर भर दिला गेला, तसंच पुढच्या पाच वर्षांत ४५२ नव्या शाळांची उभारणी आणि २११ शाळांच्या नुतनीकरणाचं नियोजन केलं आहे असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी सुरु केलेल्या स्टँड-अप इंडिया योजनेमुळे अनुसूचित जाती आणि जमाती वर्गातल्या महिलांना कर्जाची सुविधा उपलब्ध झाली असल्याचं ते म्हणाले.
Hadapsar News Bureau.