विद्यापीठात स्टार्टअपसाठी सीड फंड मिळणार..!

University will get seed funds for startups ..!

विद्यापीठात स्टार्टअपसाठी सीड फंड मिळणार..!

अर्ज करण्याचे आवाहन: ‘एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन’ ला पाच कोटींचा निधी

पुणे  : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन’ ला स्टार्टअप इंडिया योजनेंतर्गत पाच कोटींचे बीज भांडवल (सीड फंड) प्राप्त झाले असून यांतर्गत निवडक स्टार्टअप ना सीड फंड उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याचे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

‘एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन’ ही स्टार्टअप विषयात काम करणारी सेक्शन ८ कंपनी असून या माध्यमातून स्टार्टअप ना मार्गदर्शन करणे, नवउद्योजक घडविण्यासाठी मार्गदर्शन करणे, स्टार्टअप ना निधी उपलब्ध करुन देणे आदी विषयात काम करते. केंद्र सरकारच्या ‘स्टार्टअप इंडिया’ कार्यक्रमांतर्गत ‘सीड फंड स्कीम’ च्या माध्यमातून फाऊंडेशनला हा निधी प्राप्त झाला आहे. चांगल्या स्टार्टअप ना बळ मिळावे यासाठी ही संधी उपलब्ध करुन दिली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्र व रिसर्च पार्क फाऊंडेशनकडून विद्यार्थ्यांना स्टार्टअप विषयक मार्गर्शन केले जाते. या सीड फंडच्या निमित्ताने अनेक स्टार्टअपना नवकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यास मदत होईल.
– डॉ. अपूर्वा पालकर, संचालिका
नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य विभाग केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

या सीड फंडसाठी कोणतीही नोंदणीकृत कंपनी, गट किंवा स्वतंत्र व्यक्ती अर्ज करू शकते. यासाठीच्या पात्रतेच्या अटी https://seedfund.startupindia.gov.in/ या लिंकवर जाहीर करण्यात आल्या आहेत. संकल्पना, उत्पादन विकास, उत्पादन चाचण्या, बाजार प्रवेश आणि व्यापारीकरण या टप्प्यातील स्टार्टअप ना यासाठी अर्ज करता येईल अशी माहिती नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्राच्या संचालिका डॉ.अपूर्वा पालकर यांनी दिली.

डॉ. पालकर म्हणाल्या, आलेल्या अर्जांची छाननी तज्ञांच्या समितीमार्फत केली जाईल. अर्जदारांना ४५ दिवसांच्या आत निकाल कळविला जाईल. निधीच्या २० टकके रक्कम ही सुरुवातीच्या टप्प्यावर असणाऱ्या स्टार्टअपसाठी दिली जाईल तर उर्वरित स्टार्टअपना डिबेंचरमध्ये रुपांतरीत निधी दिला जाईल. जे स्टार्टअप डीआयपीपी अंतर्गत नोंदणीकृत असतील त्यांनाच या फांडसाठी अर्ज करता येईल.
दोन वर्षापेक्षा जुन्या असलेल्या कंपन्यांना यासाठी अर्ज करता येणार नाही, असेही डॉ.पालकर यांनी सांगितले.

कोट
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्र व रिसर्च पार्क फाऊंडेशनकडून विद्यार्थ्यांना स्टार्टअप विषयक मार्गर्शन केले जाते. या सीड फंडच्या निमित्ताने अनेक स्टार्टअपना नवकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यास मदत होईल.
– डॉ. अपूर्वा पालकर, संचालिका
नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य विभाग केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

 

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

One Comment on “विद्यापीठात स्टार्टअपसाठी सीड फंड मिळणार..!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *