राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी

Rain with gale force winds at many places in the state राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

Unseasonal rains in various parts of the state

राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी

येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

Rain with gale force winds at many places in the state राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar Newsमुंबई : राज्याच्या विविध भागात काल बेमोसमी पावसानं हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यात बागलाणसह काही भागात काल पाऊस झाला होता. त्यानंतर नाशिक शहरात मध्यरात्री 3 वाजेपासून बेमोसमी पावसानं हजेरी लावली. विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या पावसाने झोडपून काढले. आज सकाळी साडे आठ वाजेपर्यंत 9 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली. आजही ढगाळ वातावरण आहे.

छत्रपती संभाजीनगर आणि परिसरात आज सकाळी अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. जिल्ह्यात वाळूज, चापानेर परिसरातही आज पाऊस झाला. यामुळे गहू, कांदा, हरबरा पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

धुळे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालं. धुळ्यातल्या शिंदखेडा तालुक्यात वीज पडल्याने वरझ़डी गावात दोन तर शिरपूरमध्ये एक बैल ठार झाला. जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण आहे.

या अवकाळी पावसाचा मोठा फटका ग्रामीण भागाला बसला आहे. या पावसामुळं काढणीला आलेला कांदा, गहू आणि हरभरा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळं पिकांवर रोग पडण्याची शक्यता देखील आहे. तसेच फळबागांना देखील फटका बसण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांची रब्बी पिकांची काढणी सुरु केली आहे. यामध्ये तुर, हरभरा, वाल पिकाची काढणी सुरु आहे. अशातच अचानक अवकाळी पाऊस सुरु झाल्यानं शेतकऱ्यांची तारंबळ उडाली आहे.

दरम्यान, येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे; काही ठिकाणी विजांसह गारपिटीचाही अंदाज आहे. याच काळात विदर्भ आणि कोकणातही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *