The Prime Minister will unveil the Jan-Samarth portal, a website for debt-linked government schemes, tomorrow
प्रधानमंत्री उद्या ऋण संलग्न सरकारी योजनांसाठीची वेबसाइट-जन समर्थ पोर्टलचे करणार अनावरण
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीत ऋण संलग्न सरकारी योजनांसाठीची वेबसाइट-जन समर्थ पोर्टलचे अनावरण करतील. याठिकाणी सर्व प्रकारच्या सरकारी ऋण योजनांची माहिती एकत्रितरित्या उपलब्ध असेल. लाभार्थ्यांना कर्जदारांशी जोडणारं हे अशा प्रकारचं पहिलंच व्यासपीठ असेल.
जन समर्थ पोर्टलचा मुख्य उद्देश विविध क्षेत्रांच्या सर्वसमावेशक वाढ आणि विकासाला प्रोत्साहन देणं आणि त्यांना साध्या आणि सोप्या डिजिटल प्रक्रियेद्वारे योग्य प्रकारचे सरकारी लाभ प्रदान करणं हा आहे.
प्रधानमंत्री उद्या सकाळी केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्रालयानं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सप्ताहाचं उद्घाटन करतील. यामध्ये दोन्ही मंत्रालयांच्या गेल्या आठ वर्षांतल्या कामाचा मागोवा घेतला जाईल.
यावेळी प्रधानमंत्री एक, दोन, पाच, दहा आणि वीस रुपयांची विशेष नाण्यांचं अनावरण करतील. या नाण्यांमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची मुद्रा आहे, आणि दृष्टीहीन व्यक्तींनाही ती सहज ओळखता येईल.
हडपसर न्युज ब्युरो