निवडणूक कर्मचाऱ्यांकडे इतर कामं सोपवू नये असे आदेश जारी

Elections हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News. Hadapsar News

In order to prepare for the upcoming Lok Sabha and Vidhan Sabha elections, orders are issued not to assign other tasks to the election staff

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तयारी करण्याच्या दृष्टीनं, निवडणूक कर्मचाऱ्यांकडे इतर कामं सोपवू नये असे आदेश जारीElection Commision of India

मुंबई : राज्यातील सर्वच राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागले आहे. असे असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने मात्र येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरु केली आहे.

विशेष म्हणजे 2024 होणाऱ्या या निवडणुकीच्या दृष्टीने तयारीसाठी सर्व जिल्ह्यांतील निवडणूक शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणुकीसंदर्भातील कामांशिवाय अन्य कामे देऊ नका, असे आदेश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले आहेत. त्यामुळे लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुकीची तयारी देखील निवडणूक आयोगाकडून केली जात आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तयारी करण्याच्या दृष्टीनं, उपजिल्हा निवडणूक अधिकारी आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांकडे इतर कामं सोपवू नये असे आदेश काढण्यात आले आहेत.

यासंदर्भातलं परिपत्रक राज्य सरकारनं जरी केलं आहे. भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतील निवडणुकांबाबतची सगळी कामं जिल्हा स्तरावर करण्यासाठी ,उप जिल्हा निवडणूक अधिकारी हे पद अत्यंत महत्वाचं आहे, या पदावरील अधिकाऱ्यांकडे आणि इतर कर्मचाऱ्यांकडे निवडणूक विषयक कामांव्यतिरिक्त अन्य कामं सोपवली त्याचे विपरीत परिणाम निवडणूक विषयक कामांवर होण्याची शक्यता आहे, यासंदर्भात कार्यालयानं सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना वेळेवेळी आदेश देऊनही या आदेशांचं पालन होत नसल्याचे निदर्शनाला आले आहे. असं या परिपत्रकात म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *