विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमधे गदारोळ

विधानसभा नागपूर अधिवेशन Vidhan Sabha Nagpur session हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Uproar in both the Houses of the Legislature over the suspension of development works and the issue of the Nagpur Reform Project.

विकास कामांना दिलेली स्थगिती आणि नागपूर सुधार प्रन्यासाच्या मुद्दयावरुन विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमधे गदारोळ

नागपूर सुधार प्रन्यासाच्या भूखंडप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा,विधानपरिषदेत विरोधकांची मागणी
सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक भिडे वाडा येथे करण्याबाबत राज्य शासन गंभीर

नागपूर : विधानसभेत आज कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, विकास कामांच्या स्थगितीप्रकरणी सरकारला जाब विचारला. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या काळात अर्थसंकल्पात दोन्ही सभागृहात मंजूर झालेली, व्हाईट बुकमध्ये आलेली विकासकामं, शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी थांबवली. ही कामं सुरु व्हावीत म्हणून आम्ही लोकशाही मार्गानं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांना विनंती केली.विधानसभा नागपूर अधिवेशन Vidhan Sabha Nagpur session हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

मात्र केवळ काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांची कामं थांबवली आहेत. हे चुकीचं आहे, असं ते म्हणाले. ही कामं कर्नाटक किंवा गुजरातमधली आहेत का, असा संतप्त सवाल त्यांनी केला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी हौद्यात उतरुन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे कामकाज ४ वेळा तहकूब करावं लागलं.

यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी ७० टक्के कामांवरची स्थगिती उठवली असल्याचं सांगितलं. मात्र काही कामं नियमबाह्य पध्दतीनं, तरतूद नसताना घेतली आहेत. ती तातडीची असतील तर त्यावर चर्चा करुन मार्ग काढला जाईल, असे ते म्हणाले, आधीचं सरकारदेखील विरोधकांवर अन्याय करत कामं रद्द करत होतं. पण आम्ही तसं करत नाही, असं फडणवीस म्हणाले. मात्र त्यांच्या उत्तरानं विरोधकांचं समाधान झालं नाही.

गदारोळ सुरुच राहिला. कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर, विरोधी पक्षनेत्यांची- गटनेत्यांची बैठक घेऊन निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. त्यानंतर कामकाज सुरळीत झालं.

नागपूर सुधार प्रन्यासाच्या भूखंडप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा,विधानपरिषदेत विरोधकांची मागणी
नागपूर सुधार प्रन्यासाच्या भूखंडप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आज विधानपरिषदेत विरोधकांनी केली. एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना नागपूर सुधार प्रन्यासची साडेचार हेक्टरची जागा 2 कोटी रुपयात एकूण 16 जणांना दिली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना सरकार न्यायालयाचा कामकाजात हस्तक्षेप करत आहे, तशी नोंद न्यायमित्रानं केली असल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सागितलं.
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. विरोधक केवळ सभागृहाची दिशाभूल करीत असून हा भूखंडाचा विषय नाही.
2007 साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी  49 ले आउटला मंजुरी दिली होती. त्यामध्ये नागपुरातल्या या साडे चार हेक्टर जमिनीचाही समावेश आहे, त्यामुळे या भूखंडावर आक्षेप घेण्यासारखे काही नाही, असं ते म्हणाले. त्यानंतर सभागृहात गदारोळ सुरू राहिल्यानं सभापती नीलम गो‌ऱ्हे यांनी  कामकाज  दिवसभरासाठी तहकूब  केलं.
सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक भिडे वाडा येथे करण्याबाबत राज्य शासन गंभीर

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी करण्यासंदर्भात तात्काळ बैठक घेण्यात येईल आणि या राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य छगन भुजबळ यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री श्री.  शिंदे म्हणाले, सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक भिडे वाडा येथे करण्याबाबत राज्य शासन गंभीर आहे. लवकरच त्यासंदर्भात बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *