US signals to impose more sanctions on Russia
रशियावर आणखी निर्बंध लादण्याचे अमेरिकेचे संकेत
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन उद्या ब्रसेल्स इथं झालेल्या नाटो आणि युरोपीय मित्र देशांच्या बैठकीदरम्यान रशियाच्या विरोधात नवीन नियमावली जाहीर करणार असल्याची माहिती त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक स्लीव्हन यांनी काल दिली.
हल्लेखोरीला आळा घालणे आणि त्याविरुद्ध भक्कम मोर्चा उभारण्याच्या उद्देशाने बायडन भागीदार देशांच्या सहकार्याने रशियावर नवी नियमावली लागू करणार आहे, असं ते म्हणाले.
याआधीच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नाटोच्या विशेष बैठकीत बायडन सहभागी होणार असून युरोपीय शिखर परिषदेलाही ते संबोधित करणार आहेत.
याआधीच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नाटोच्या विशेष बैठकीत बायडन सहभागी होणार असून युरोपीय शिखर परिषदेलाही ते संबोधित करणार आहेत.
नाटोचे सदस्य असलेल्या पोलंडला बायडेन भेट देणार असून, पोलंडनं आतापर्यंत युक्रेनमधल्या जवळपास 20 लाख निर्वासितांना आश्रय दिला आहे.