Flag shown to sixth Vande Bharat Express in last 2 months
गेल्या 2 महिन्यात सहाव्या वंदे भारत एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा
राजस्थानमधील जयपूर आणि दिल्ली कॅंट या स्थानकादरम्यान धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा
नवी दिल्ली : राजस्थानमधील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. मेळाव्याला संबोधित करताना,पंतप्रधानांनी वीरभूमी राजस्थानचे राज्याला पहिली वंदे भारत रेल्वेगाडी मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.
वंदे भारतमुळे जयपूर दिल्ली या स्थानका दरम्यानचा प्रवास सुलभ होईल,त्यासोबतच तीर्थराज पुष्कर आणि अजमेर शरीफ सारख्या श्रद्धास्थानांपर्यंत सुलभ पोहोचण्यास ती साहाय्यभूत ठरणारी असल्याने राजस्थानच्या पर्यटन उद्योगालाही चालना मिळेल.
ही रेल्वेगाडी जयपूरहून दिल्ली- छावणी रेल्वे स्थानका पर्यंत धावणार आहे. अजमेर ते दिल्ली छावणी स्थानका दरम्यान या एक्सप्रेसची नियमित सेवा उद्यापासून सुरु होणार आहे. ही रेल्वेगाडी जयपूर, अलवर आणि गुरुग्राम या स्थानकांवर थांबा घेईल. अजमेर ते दिल्ली छावणी या रेल्वेमार्गावर आजवरची सर्वात वेगवान शताब्दी एक्सप्रेस सहा तास पंधरा मिनिटात पूर्ण करत होती परंतु वंदे भारत एक्सप्रेस हेच अंतर आता अवघ्या पाच तास पंधरा मिनिटातच पूर्ण करेल.
गेल्या दोन महिन्यांत दिल्ली-जयपूर वंदे भारत एक्स्प्रेससह देशातील सहा वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखविण्याची संधी मिळाल्याचे स्मरण पंतप्रधानांनी केले. मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस, मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस, राणी कमलापती-हजरत निजामुद्दीन वंदे भारत एक्सप्रेस, सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेस आणि चेन्नई कोईम्बतूर वंदे भारत एक्सप्रेसचा उल्लेख त्यांनी केला.
वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे 60 लाख नागरिकांनी प्रवास केला आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. “वंदे भारताचा वेग हे त्याचे मुख्य वैशिष्ठ्य असून त्यामुळे लोकांच्या वेळेची बचत होते”,असे पंतप्रधान म्हणाले. एका अभ्यासानुसार देशभरात जे लोक वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करतात ते प्रत्येक प्रवासावर 2,500 तास बचत करतात असे त्यांनी सांगितले.
राजस्थानमधील संपर्क सुविधेला दिले जाणारे प्राधान्य अधोरेखित करताना पंतप्रधानांनी तारंगा टेकडी ते अंबाजी या रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्याचा उल्लेख केला. शतकानुशतके प्रलंबित असलेली या मार्गाची मागणी आता पूर्ण होत आहे, असे ते म्हणाले.
उदयपूर-अहमदाबाद मार्गाचे ब्रॉडगेजिंग पूर्ण झाले आहे आणि 75 टक्क्यांपेक्षा जास्त रेल्वे दळणवळण सुविधेचे विद्युतीकरण झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. राजस्थानसाठी रेल्वे अर्थसंकल्पीय तरतूद 2014 पासून 14 वेळा वाढवण्यात आली असून, 2014 मधील 700 कोटींवरून ती यावर्षी 9500 कोटींपेक्षा पुढे गेली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. रेल्वे मार्गांच्या दुपदरीकरणाच्या कामालाही दुप्पट वेग देण्यात आला आहे.
डुंगरपूर, उदयपूर, चित्तोडगड, पाली आणि सिरोही या आदिवासी भागांना, रेल्वे मार्गांच्या गेज मधील बदल आणि दुपदरीकरणाचा फायदा झाला आहे. अमृत भारत रेल्वे योजने अंतर्गत डझनभर स्थानकांची श्रेणी सुधारणा केली जात आहे, असेही ते म्हणाले.
अजमेर-दिल्ली कॅन्टोनमेंट वंदे भारत एक्सप्रेस ही हाय राइज ओव्हरहेड इलेक्ट्रिक (OHE) क्षेत्रावरील जगातील पहिली सेमी हायस्पीड प्रवासी रेल्वे गाडी असेल. या गाडीमुळे पुष्कर, अजमेर शरीफ दर्गा इत्यादींसह राजस्थानमधील प्रमुख पर्यटन स्थळांबरोबरचे दळणवळण सुधारेल. दळणवळण सुधारल्यामुळे या प्रदेशातल्या सामाजिक-आर्थिक विकासालाही चालना मिळेल.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com