वंदे भारत एक्सप्रेस ही जलद बदलाच्या मार्गावर असलेल्या नव्या भारताच्या क्षमतेचं प्रतीक

Vande Bharat 2 High-Speed ​​Train वंदे भारत 2 हाय-स्पीड ट्रेन हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Vande Bharat Express is a symbol of the potential of a new India on the path of rapid change – Prime Minister

वंदे भारत एक्सप्रेस ही जलद बदलाच्या मार्गावर असलेल्या नव्या भारताच्या क्षमतेचं प्रतीक

– पंतप्रधान नरेंद्र मोदी

वंदे भारत एक्सप्रेसमुळे आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा परस्पर सामायिक वारसा एकमेकांशी जोडला जाणार

वंदे भारत एक्सप्रेस म्हणजे नव भारताच्या क्षमता आणि संकल्पाचे प्रतिक

गेल्या सात-आठ वर्षांत केलेल्या कामामुळे येत्या सात ते आठ वर्षांमध्ये भारतीय रेल्वेचा कायापालट झाल्याचे दिसेल

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिकंदराबाद ते विशाखापट्टणमला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. भारतीय रेल्वेने सुरू केलेली ही आठवी वंदे भारत एक्सप्रेस आहे, तसेच तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन तेलुगू भाषिक राज्यांना जोडणारी ही पहिली रेल्वे असणार आहे. ही रेल्वे या भागातील ७०० किलोमीटर भागातून धावेल. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम, राजमुंद्री आणि विजयवाडा स्थानकांवर तसेच तेलंगणातील खम्मम, वारंगल आणि सिकंदराबाद स्थानकांवर ही गाडी थांबा घेईल.Vande Bharat 2 High-Speed ​​Train वंदे भारत 2 हाय-स्पीड ट्रेन हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

वंदे भारत एक्सप्रेस ही जलद बदलाच्या मार्गावर असलेल्या नव्या भारताच्या क्षमतेचं प्रतीक आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी न्हटलं आहे. ते आज सिकंदराबाद आणि विशाखापट्टणमला जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवल्यानंतर बोलत होते.

ही वंदे भारत एक्सप्रेस सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण असून ती तेलंगणा आणि आंध्र प्रदेश प्रदेशांना जोडणार आहे. यामुळे जीवनसुलभता आणि पर्यटनाला चालना मिळेल, त्याचा अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असं ते म्हणाले.

गेल्या काही वर्षांत सात वंदे भारत ट्रेननं २३ लाख किलोमीटरचा प्रवास केला असून, ४० लाख प्रवाशांची वाहतूक केली आहे. रेल्वे बजेट २०१४ पूर्वीच्या २५० कोटी रुपयांवरून सध्या ३ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढलं आहे, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. वंदे भारत एक्स्प्रेस तेलुगू भाषिक राज्यांसाठी एक नवीन क्रांती आणत असल्याचं प्रतिपादन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केलं.

४ वर्षांपूर्वी २०१४ च्या काळात तेलंगणामध्ये १२५ किलोमीटरहून कमी नवीन रेल्वे मार्ग बांधण्यात आले होते, तर गेल्या वर्षांत तेलंगणात सुमारे ३२५ किलोमीटरच्या नवीन रेल्वे लाईन बांधण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. तेलंगणामध्ये २५० किलोमीटरहून अधिक लांबीच्या ‘ट्रॅक मल्टी ट्रॅकिंग’चे कामही करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आणि या विद्युतीकरणाच्या काळात राज्यातील रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण ३ पटीने वाढले आहे, असे त्यांनी सांगितले. “तेलंगणातील सर्व ब्रॉडगेज मार्गांच्या विद्युतीकरणाचे काम लवकरच पूर्ण करणार आहोत”, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

वंदे भारत एक्सप्रेस ही स्वदेशात संकल्पित आणि निर्मित रेल्वे अत्याधुनिक प्रवासी सुविधांनी सुसज्ज आहे. प्रवाशांना ही रेल्वे जलद, अधिक आरामदायी आणि अधिक सोयीस्कर प्रवासाचा अनुभव देईल.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *