क्रीडा दिनाच्या निमित्ताने साधना विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन

Various competitions are organized in Sadhana Vidyalaya on the occasion of Sports Day क्रीडा दिनाच्या निमित्ताने साधना विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Various competitions are organized in Sadhana Vidyalaya on the occasion of Sports Day

क्रीडा दिनाच्या निमित्ताने साधना विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन

खिलाडूवृत्तीने खेळ खेळावेत : प्राचार्य दत्तात्रय जाधव

हडपसर : ” खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. खेळाच्या माध्यमातून उत्तम नागरिक घडत असतात. खेळामुळे शरीर निरोगी व मजबूत होते. खेळात हार आणिVarious competitions are organized in Sadhana Vidyalaya on the occasion of Sports Day क्रीडा दिनाच्या निमित्ताने साधना विद्यालयात  विविध स्पर्धांचे आयोजन  हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News पराजय होतच असतात. जिंकणे किंवा हारणे या उद्देशाने न खेळता खेळाडूंनी स्वतःतील कौशल्य वाढवण्यासाठी खेळावे.विजयाने हुरळू नये आणि पराभवाने खचून जाऊ नये. खेळाडूंनी खिलाडूवृत्तीने खेळावे असे मत साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्यु.कॉलेजचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद व आजीव सभासद बोर्डाचे सचिव प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी मांडले.

साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्यु.कॉलेज,हडपसर येथे मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या उपक्रमाचे आयोजन साधना विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव, पर्यवेक्षक दिलीप क्षीरसागर, शिवाजी मोहिते यांनी केले होते.क्रीडा दिनाच्या निमित्ताने इयत्ता 5 वी ते 12 वीमधील विद्यार्थ्यांच्या खो-खो ,कबड्डी व मनोरंजन खेळ संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.विद्यार्थ्यांनी अत्यंत जोशपूर्ण आणि उत्साही वातावरणात खेळाचे प्रदर्शन केले.

या क्रीडा स्पर्धांचे संयोजन क्रीडाशिक्षक लालासाहेब खलाटे ,रमेश महाडीक,अशोक कोलते,गणेश निचळे,सचिन धोदाड,कोंडिबा टेंगले यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक दिलीप क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचालन अनिल वाव्हळ यांनी केले तर आभार पर्यवेक्षक शिवाजी मोहिते यांनी मानले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *