Various cultural programs are organized at 6 places on the occasion of Diwali
दीपावलीनिमित्त 6 ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार
पुण्यामध्ये सदाशिव पेठ येथील भरत नाटयमंदिर येथे कार्यक्रम होणार
मुंबई: सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील 6 ठिकाणी दीपावलीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दीपावली पहाट व दीपावली संध्या या स्वरूपात होणाऱ्या या सांगितिक कार्यक्रमंचे नाव “लखलख चंदेरी” असे असून यातील पहिला कार्यक्रम रविवार 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता नागपूरच्या वंजारी नगर मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. याठिकाणी स्वप्नील बांदोडकर यांच्यासह सन्मिता शिंदे, डॉ. वैशाली उपाध्ये, मुकुल पांडे, आदित्य सावरकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
अमरावती येथे रविवारी 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजता दीपावली संध्या आयोजित करण्यात आली आहे. डॉ. मंजिरी सय्यद, सारंग जोशी आणि संच यावेळी आपला कार्यक्रम सादर करणार आहेत. तर सोमवारी 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता दीपावली पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अजित परब, मुग्धा कऱ्हाडे आणि संच यावेळी आपला कार्यक्रम सादर करणार आहेत. सदर दोन्ही कार्यक्रम अमरावती येथील परिणय-बंध हॉल, बडनेरा रोड येथे होणार आहेत.
मुंबई येथे मंगळवारी 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता दीपावली संध्या आयोजित करण्यात आली आहे. शौनक अभिषेकी, कार्तिकी गायकवाड, प्रसेनजीत कोसंबी आणि इतर कलाकार आपली कला सादर करणार आहेत. तर बुधवारी 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता दीपावली पहाट आयोजित करण्यात आली आहे. अजित कडकडे, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि संच यावेळी आपला कार्यक्रम सादर करणार आहेत. सदर दोन्ही कार्यक्रम मुंबई येथील रवींद्र नाटय मंदिर, प्रभादेवी येथे होणार आहेत.
नाशिक येथे मंगळवारी 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजता दीपावली संध्या आयोजित करण्यात आली आहे. डॉ. गणेश चंदनशिवे, आकांक्षा कदम, समाधान आणि इतर कलाकार आपली कला सादर करणार आहेत. तर बुधवारी 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता दीपावली पहाट आयोजित करण्यात आली आहे. संजीव चिम्मलगी, केतन पटवर्धन, मधुरा कुंभार आणि संच यावेळी आपला कार्यक्रम सादर करणार आहेत. सदर दोन्ही कार्यक्रम नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिर येथे होणार आहेत.
पुणे येथे मंगळवारी 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता दीपावली संध्या आयोजित करण्यात आली आहे. केतकी माटेगांवकर, श्रीधर फडके, पं. संजीव अभ्यंकर, नारायण खिल्लारी आणि इतर कलाकार आपली कला सादर करणार आहेत. तर बुधवारी 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 5 वाजता दीपावली पहाट आयोजित करण्यात आली आहे. सावनी रवींद्र, प्रसेनजीत कोसंबी, सौरभ काडगावकर आणि संच यावेळी आपला कार्यक्रम सादर करणार आहेत. सदर दोन्ही कार्यक्रम पुण्यातील सदाशिव पेठ येथील भरत नाटयमंदिर येथे होणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे मंगळवारी 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजता दीपावली संध्या आयोजित करण्यात आली आहे. अभिजीत कोसंबी, अभिषेक नलावडे, दीपाली देसाई, संज्योती जगदाळे आणि इतर कलाकार आपली कला सादर करणार आहेत. तर बुधवारी 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता दीपावली पहाट आयोजित करण्यात आली आहे. मंगेश बोरगांवकर आणि रसिका नातू यावेळी आपला कार्यक्रम सादर करणार आहेत. सदर दोन्ही कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया नाटयमंदिर येथे होणार आहेत.
राज्यातील 6 ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या सर्व कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून या कार्यक्रमांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रसिाद द्यावा असे आवाहन श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com