पावसाळ्यात संभाव्य आपद्स्थितीला तोंड देण्यासाठी कोकण रेल्वेकडून विविध उपाययोजना

Various measures taken by the Konkan Railway to deal with possible disasters during monsoons

पावसाळ्यात संभाव्य आपद्स्थितीला तोंड देण्यासाठी कोकण रेल्वेकडून विविध उपाययोजना

मुंबई : आगामी पावसाळ्यात अपघात टाळण्यासाठी, संभाव्य आपद् स्थितीला तोंड देण्यासाठी सुरक्षेसाठी कोकण रेल्वेनं सर्वतोपरी तयारी केली आहे.आणीबाणीच्या प्रसंगी नियंत्रण कक्षाशी, किंवा रेल्वेस्थानकांशी संपर्क साधण्यासाठी सुरक्षा श्रेणीतल्या सर्व कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन, गाड्यांचे गार्डस आणि लोकोपायलट्सना वॉकीटॉकी, वायरलेस संपर्काची साधनं कोकण रेल्वे मार्गावर गस्त घालणारे कर्मचारी आणि देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्टेशन मास्तर आणि नियंत्रण कक्षाशी तातडीनं संपर्क साधता यावा, यासाठी सरासरी एक किलोमीटरच्या अंतरानं ईएमसी सॉकेट्स, अपघाताच्या वेळी मदत कार्य करणाऱ्या वैद्यकीय वाहनांमधे सॅटेलाईट फोन, इत्यादी सुविधा पुरवल्या आहेत.

सर्व मुख्य सिग्नल स्पष्ट दिसावेत, यासाठी एलईडीचा वापर केला आहे. माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उडीपी या नऊ स्थानकांवर स्वतः नोंदणी ठेवणारे पर्जन्यमापक बसवले आहेत.

हे पर्जन्यमापक पावसाचा जोर वाढला तर, संबधित अधिकाऱ्यांना सतर्क करतील. काळी, सावित्री आणि वशिष्टी या नद्यांवर पुलांसाठी पुराचा इशारा देणारी यंत्रणा पुरवली आहे. पावसाळ्यात गाड्या सुरक्षित चालव्यात यासाठी, बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव इथले नियंत्रण कक्ष चोवीस कार्यरत राहतील. पावसाळ्यातलं रेल्वेवेळापत्रक येत्या १० जूनपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू राहील. कोकण रेल्वेच्या वेबसाईटसवर पावसाळ्यात प्रवाशांना गाड्यांची स्थिती पाहता येईल.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *