‘सीएनजी’वरील व्हॅट कपातीची वित्त विभागाची अधिसूचना जारी

After Deputy Chief Minister Ajit Pawar’s budget announcement, the Finance department issues notification of VAT deduction on CNG

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थसंकल्पातील घोषणेनंतर ‘सीएनजी’वरील व्हॅट कपातीची वित्त विभागाची अधिसूचना जारी

मुंबई : उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्के इतका कमी केल्याची

Traffic Sign CNG Gas Station
Image by PIXABAY.COM

अधिसूचना काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जारी करण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील वित्त विभागाने काल जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे दि. 1 एप्रिलपासून राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार असून याचा फायदा ऑटोरिक्शा, टॅक्सी चालकांसह, प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच नागरिकांना होणार आहे.

प्रदुषण नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्वाचा आहे. सीएनजीचे कमी झालेले नवे दर दि. 1 एप्रिल 2022 पासून लागू होतील.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *