राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ निकाल देणार

Supreme Court हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

The Constitutional Bench of the Supreme Court will give a verdict on the power struggle in the state

राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ निकाल देणारUddhav Thackeray and Eknath Shinde उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून भाजपासोबत सत्ता स्थापन केली. यामुळे राज्यात सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात वादळी सुनावणी झाली आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांच्याही वकिलांनी जोरदार युक्तीवाद करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ उद्या निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर या याचिकेवर पुढची सुनावणी उद्या होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या संदर्भात तसेच शिंदे यांची विधिमंडळ गटनेतेपदावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेली हकालपट्टी, शिंदे यांनी या पदावर स्वत: ची केलेली नियुक्ती वैध आहे का, मुख्य प्रतोदपदी सुनील प्रभू की भरत गोगावले, राज्यपालांनी बहुमत चाचणीचा दिलेला आदेश, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यावरील अविश्वास प्रस्थाव आदी मुद्यांवर घटनापीठ निर्णय देणार आहे.

त्याच प्रमाणे पक्षांतर बंदी कायद्यानुसार दोनतृतीयांशहून अधिक आमदारांचा गट फुटल्यास त्यांना अन्य पक्षात विलीन होण्याचे बंधन आहे. शिंदे गट कोणत्याही पक्षात विलीन झालेला नाही, त्यांनी आपण खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने तोच मूळ पक्ष असल्याचे मान्य करून शिंदे यांना धनुष्यबाण निवडणूक चिन्ह दिले आहे.

नवीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवड आणि शिंदे-फडणवीस सरकारने बंडखोर आमदारांच्या पाठिंब्याने जिंकलेला विश्वासदर्शक ठराव वैध आहे की नाही, या बाबी सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) तपासणार आहे. या संदर्भात न्यायालय निकाल देणार आहे. अनेक घटनातज्ज्ञांनीही न्यायालयाचा निकाल लवकरच येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या निकालाकडे नागरिकांसह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज समलैंगिक संबंधांवरच्या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान हे संकेत दिले होते. समलैंगिक संबंधावरच्या याचिकेवर उद्या दुपारी १२ वाजेनंतर सुनावणी होऊ शकते. कारण त्यापूर्वी आम्हाला घटनापीठाकडे प्रलंबित असलेल्या दोन याचिकांवर निकाल द्यायचा आहे, असं सरन्यायाधीश आज सुनावणी दरम्यान म्हणाले.

राज्यातल्या सत्तासंघर्षावरची शेवटची सुनावणी १६ मार्चला झाली होती आणि त्यादिवशी घटनापीठानं निकाल राखून ठेवला होता. तसंच दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातल्या अधिकार कक्षेच्या संदर्भात १८ जानेवारीला न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता.

या दोन्ही प्रकरणांची सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी. एस. नरसिम्हा यांच्या घटनापीठासमोर झाली. न्यायमूर्ती शाह येत्या सोमवारी सेवानिवृत्त होणार असल्यानं त्यापूर्वी या दोन्ही प्रकरणांचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आणि महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षाला सर्वोच्च न्यायालायत आव्हान देण्यात आले. १६ आमदार अपात्र ठरवण्यात यावे अशीही याचिका यावेळी करण्यात आली होती. याप्रकरणी उद्या निकाल लागणार आहे. त्यामुळे १६ आमदार अपात्र ठरतात का? की विधानसभा अध्यक्षांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालय नकार देतंय याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणाला उद्या ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *