ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार जाहीर

Veteran actor Dr Mohan Agashe ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

This year’s Gadima Award has been announced to veteran actor Dr Mohan Agashe

ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार जाहीर

मुंबई : साहित्य चित्रपट आणि कलाक्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा गदिमा पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांना जाहीर झाला आहे. एकवीस हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. Veteran actor Dr Mohan Agashe ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

या पुरस्काराबरोबर दिला जाणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कारानं साधना बहुलकर यांना मिळाला आहे. ११ हजार रुपये सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराच स्वरूप आहे.

तर, चैत्रबन पुरस्कार यंदा अभिनेता-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना, तर विद्या प्रज्ञा पुरस्कार नव्या उभारीच्या गायिका योगिता गोडबोले यांना जाहीर झाला आहे.

५ हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे. येत्या १४ तारखेला गदिमांच्या स्मृतीदिनी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रेक्षागृहात इथं आयोजित समारंभात या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.

याच समारंभात गदिमांचे ज्येष्ठ पुत्र श्रीधर माडगूळकर यांच्या पत्नी शितल श्रीधर माडगूळकर यांनी लिहिलेलं, “गदिमांच्या पंचवटीतून” या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *