Veteran Marathi film actor Bhalchandra Kulkarni passed away
मराठी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन
कोल्हापुर : मराठी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं आज सकाळी कोल्हापुरात अल्पशा आजारानं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. पाच दशकांहून अधिक काळ ते मराठी चित्रपट-नाट्यसृष्टीमध्ये कार्यरत होते.
साधा चित्रकर्मी, कलासंपन्न नाट्यकर्मी, लोककला अभ्यासक, अभिनेते, लेखक, दिग्दर्शक, गीतकार अशी भालचंद्र कुलकर्णी यांची ओळख होती.
भालचंद्र कुलकर्णी यांचं मराठी सिनेमातील योगदान मोठं आहे, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या होत्या.
चरित्र अभिनेता म्हणून ओळख असलेल्या कुलकर्णी यांनी १९६५ मध्ये शेरास सव्वाशेर या सिनेमातून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली . “पिंजरा, असला नवरा नको ग बाई, मुंबईचा फौजदार, सोंगाड्या, एक गाव बारा भानगडी, सुगंधी कट्टा , करावे तसे भरावे, चंदनाची चोळी अंग अंग जाळी, थरथराट, खतरनाक, धुमधडाका यासह ३०० हून अधिक चित्रपटात त्यांनी भूूमिका साकारल्या.कला क्षेत्रातल्या योगदानाबद्दल अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळानं त्यांना चित्रभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.
भालचंद्र कुलकर्णी हे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक सुद्धा होते. याशिवाय चित्रपट महामंडळाने त्यांना चित्रभूषण पुरस्कार त्यांच्या कार्याचा गौरव केला. जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
भालचंद्र कुलकर्णी यांच्या निधनानंतर मराठी कलाविश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भालचंद्र कुलकर्णी यांच्या निधनानंतर अनेक चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com