Vice President visits Ram Nagari Ayodhya, calls it “the fulfillment of a long cherished dream”
उपराष्ट्रपतींची राम नगरी अयोध्येला भेट, त्यांच्या मते ही भेट म्हणजे “दीर्घकाळच्या स्वप्नाची पूर्तता”
अयोध्या : उपराष्ट्रपती, एम. वैंकय्या नायडू यांनी पत्नी उषा नायडू यांच्या समवेत आज अयोध्या या ऐतिहासिक शहराला भेट दिली जिथे त्यांनी रामजन्मभूमी स्थळ आणि प्रसिद्ध हनुमान गढी मंदिरात पूजा केली.
त्यानंतर लगेचच, उपराष्ट्रपतींनी सपत्नीक रामजन्मभूमी स्थळाला भेट दिली जिथे रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या सदस्यांनी आगामी राम मंदिराची 3-डी प्रतिकृती दाखवणाऱ्या लघुपटाद्वारे तपशीलवार सादरीकरण केले.
त्यानंतर, नायडू यांनी निर्माणाधीन राम मंदिराच्या गर्भगृहाच्या ठिकाणी पूजा केली आणि राम लल्लाची प्रार्थनाही केली. रामजन्मभूमी येथील अभ्यागत पुस्तकात त्यांनी लिहिले –
आज रामजन्मभूमीला भेट देऊन धन्य झालो. प्रभू राम हे आपल्या संस्कृतीचे, आपल्या मूल्यांचे आणि आपल्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक आहेत. मर्यादा पुरुषोत्तम यांच्या जीवनाने भारतातील लोकांना नेहमीच प्रेरणा दिली आहे आणि त्यांना सन्मार्ग दाखवला आहे.
अयोध्येतील भव्य राम मंदिराची पुनर्बांधणी हा भारतातील अध्यात्मिक पुनर्जागरणाचा क्षण आहे. मला खात्री आहे की हे मंदिर भावी पिढ्यांना आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा आदर करण्यासाठी आणि त्यांना सत्य, न्याय आणि बंधुत्वाचा मार्ग दाखवण्यासाठी प्रेरणा देत राहील.”
इतर मान्यवरांसह उपराष्ट्रपती नंतर सपत्नीक पवित्र शरयू नदीकाठी गेले आणि भगवान रामाच्या जीवनाशी निगडित या प्राचीन नदीची प्रार्थना केली.
अयोध्येहून परतल्यावर, उपराष्ट्रपतींनी राम नगरी येथील त्यांचा समृद्ध भावनिक आणि आध्यात्मिक अनुभव सामायिक करणारी एक फेसबुक पोस्ट लिहिली. उपराष्ट्रपतींनी लिहिलेल्या फेसबुक पोस्टची लिंक याप्रमाणे –
उपराष्ट्रपतींची इंग्रजीत फेसबुक पोस्ट –https://www.facebook.com/167328870501701/posts/1136976223536956/
उपराष्ट्रपतींची हिंदीत फेसबुक पोस्ट –https://www.facebook.com/167328870501701/posts/1136985900202655/
Hadapsar News Bureau.