बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे “ दक्षता जागृती सप्ताह २०२२ “ संपन्न

Bank of Maharashtra हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

“Vigilance Awareness Week 2022” concluded by the Bank of Maharashtra

बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे “ दक्षता जागृती सप्ताह २०२२ “ संपन्न

पुणे : देशाच्या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे त्यांच्या सर्व शाखा व कार्यालयांमध्ये दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ ते दिनांक ६ नोव्हेंबर २०२२ या दरम्यान “ विकसित देशासाठी भ्रष्टाचार मुक्त भारत “ या घोषवाक्यासह “ दक्षता जागरूकता साप्ताह २०२२ “ साजरा करण्यात आला.

दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए एस राजीव यांनी बँकेच्या मुख्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना सचोटीची शपथ देऊन सप्ताहाला प्रारंभ झाला. या प्रसंगी बँकेचे कार्यकारी संचालक श्री ए बी विजय कुमार व श्री आशिष पांडे तसेच मुख्य दक्षता अधिकारी श्री अमित श्रीवास्तव यांनी माननीय राष्ट्रपती, माननीय उपराष्ट्रपती, माननीय पंतप्रधान व केंद्रीय दक्षता आयोगाच्या माननीय अध्यक्षांकडून भ्रष्टाचार विरोधी अभियानाचे महत्व तसेच सचोटी व प्रामाणिकपणे देशाची सेवा करण्याचे महत्व विशद करणाऱ्या संदेशांचे बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी वाचन केले. Bank of Maharashtra हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

दक्षता जागरुकता सप्ताहाच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या ग्राहकांसाठी एक महिना कालावधीचे “ सायबर सुरक्षा जागरुकता अभियानाची “ सुरवात केली. सदर कालावधीत सर्वसामान्य लोकांसाठी आणि बँकेच्या ग्राहकांसाठी प्रश्नमंजुषा
आयोजित करण्यात येणार आहे. तसेच सहभाग घेऊन त्यात यशस्वी होणाऱ्यांना डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. बँकेच्या ग्राहकांमध्ये सायबर सुरक्षितते बाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी लघु संदेश व इ मेलच्या माध्यमातून व्यापक मोहीम
आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी कर्मचाऱ्यांसाठी “ व्हिजी कॉर्नर “ हा विशेष माहिती तंत्रज्ञान मंच सुरु करण्यात आला आहे.

बँकेला विविध सेवा देणाऱ्या अधिवक्ते, लेखा परीक्षक, सुरक्षा अभिकरणे, कर्मचारी कंत्राटदार, माहिती तंत्रज्ञान उत्पादने विक्रेते व इत्यादी, अशा सेवा पुरवठादारांसाठी दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सदर कार्यक्रमात बँकेच्या संचालक मंडळाच्या सभासदांनी सेवा पुरवठादारांशी संवाद साधला.

दक्षता जागरूकता सप्ताहांच्या दरम्यान प्रश्न मंजुषा व घोषवाक्य लेखन स्पर्धा, कार्यशाळा, जागरुकता कार्यक्रम, कर्मचाऱ्यांसाठी स्पर्धा व मेळावे, रेडियो जिंगल्सचे प्रक्षेपण, भित्तीचित्रे व जाहिरात फलकांचे प्रदर्शन, ग्राम सभेत जागरुकता कार्यक्रम, स्वमदत बचत गटांच्या बैठका इत्यादी उपक्रम आयोजित करण्यात आले. नागरिकांमध्ये दक्षता सापतःबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पुणे शहरामध्ये मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण देशभरात सर्वसामान्य जनता व कर्मचाऱ्यांसाठी इ प्रतिज्ञा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून अनेक शाखांनी ग्राहक मेळाव्यांचे देखील आयोजन
केले होते.

दक्षता सप्ताहाच्या बाबत जागरुकता निर्माण दक्षता जागरूकता सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी पुणे शहरामध्ये दुचाकी फेरी आयोजित करण्यात आली. समारोपाच्या कार्यक्रमात दक्षता जागरूकतेशी संबंधित विविध उपक्रमांची माहिती संकलित करणाऱ्या “ संवाद सरिता “ या पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. दक्षता जागरूकता सप्ताहाच्या समारोपाच्या कार्यक्रमात बँकेच्या मुख्यालयातील वरिष्ठ व्यवस्थापनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *