विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काल झालेलं मतदान अवैध

aditya-thackeray आदित्य ठाकरे हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Voting in Assembly elections yesterday is illegal – Aditya Thackeray

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काल झालेलं मतदान अवैध – आदित्य ठाकरे

निवडणूक झालीच तर मोठ्या ताकदीनं पुन्हा निवडून येऊ

मुंबई : महाराष्ट्रात मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकून, बहुमत सिद्ध केलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या

aditya-thackeray आदित्य ठाकरे हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

प्रस्तावाला भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. सदस्यांनी मतविभाजनांची मागणी केल्यानंतर सदस्यांच्या शिरगणतीनं मतमोजणी झाली. १६४ सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूनं मतदान केलं, तर ९९ सदस्यांनी विरोधात मतदान केलं.

शिंदे गटात कालच सामिल झालेले हिंगोलीतल्या कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी सरकारच्या बाजूनं मतदान केलं. समाजवादी पार्टीचे २ आणि एमआयएमचे एक आमदार तटस्थ राहिले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं.

अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह २० सदस्य मतदानाच्या वेळी सभागृहात अनुपस्थित होते. त्यात काँग्रेसच्या १० आमदारांचा समावेश आहे.

विश्वासदर्शक ठरावावर मतदान झाल्यावर यातले काही सदस्य सभागृहात दाखल झाले. विश्वासदर्शक ठरावानंतर शिवसेनेच्या ४० सदस्यांनी पक्षादेश पाळला नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न मुख्य प्रतोद सुनिल प्रभु यांनी केला. यावर हे सगळं, सभागृहाच्या पटलावर असल्याचं सांगत, अध्यक्षांनी परवानगी नाकारली.

आमच्या व्हिपचं उल्लंघन झालं आहे. आम्ही विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे दाद मागणार, याचिका वगैरे करणार आहोत. व्हिप मोडला त्यांच्यावर कारवाई तर होणारच आहे. सकाळी वाहतूक कोंडीमुळे आमची धावपळ झाली, पण सगळे व्यवस्थित पोहोचले. काही जण बाहेर राहिले, दरवाजे लॉक झाले, त्यामुळे त्यांचं मत मिळू शकलं नाही, म्हणून महाविकास आघाडीची मतं कमी झाली, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काल झालेलं मतदान अवैध असून त्याला न्यायालयात आव्हान देणार असल्याचं शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज विधानभवनाबाहेर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.

हे ही वाचा
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर याची निवड.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ६ महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना व्यक्त केली होती. आदित्य ठाकरे यांनी या शक्यतेला दुजोरा दिला.

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता हे नाकारता येणार नाही, असं ते म्हणाले. निवडणूक झालीच तर मोठ्या ताकदीनं पुन्हा निवडून येऊ, असं त्यांनी सांगितलं. तर, अजय चौधऱी यांचं गटनेते पद रद्द करणं किंवा प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची मान्यता रद्द करणं, हे दबावाखाली होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केला.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *