Voting tomorrow in Parliament House for election to the post of Vice President
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी संसद भवनात उद्या मतदान
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदासाठी उद्या. संसद भवनात सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होईल. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनकर आणि विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात उपराष्ट्रपती पदासाठी लढत होणार आहे.
संसदेच्या दोन्ही सदनातल्या सदस्यांद्वारे प्रमाणित प्रतिनिधित्व प्रणालीनुसार केलेल्या मतदानातून उपराष्ट्रपतींची निवड केली जाते.
संसदेच्या सदस्यांची एकूण संख्या ७८८ असून या पैकी ५४३ लोकसभा सदस्य, २३३ राजसभा सदस्य आणि १२ निर्वाचित सदस्य आहेत. उद्या मतदानाची वेळ संपताच संसदेतच मत मोजणी केली जाणार आहे. सध्याचे उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांचा कार्यकाळ येत्या १० तारखेला संपणार आहे
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com