Sharad Pawar’s statement that we have not had any discussion with the Vanchit Bahujan Aghadi and the position has not been clarified
वंचित बहुजन आघाडी सोबत आम्ही कोणतीही चर्चा केली नसून याबाबत भूमिका स्पष्ट झाली नसल्याचं शरद पवार यांची स्पष्टोक्ती
आगामी निवडणुका आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार
मूड ऑफ नेशन’च्या सर्वेक्षणानुसार लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात ३४ जागांवर विजय मिळेल
कोल्हापूर : वंचित बहुजन आघाडी सोबत आम्ही कोणतीही चर्चा केली नसून याबाबत भूमिका स्पष्ट झाली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापूरात बातमीदारांशी बोलत होते.
आगामी निवडणुका आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत एकत्र आहोत असं ते म्हणाले.
तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे सांगत त्यांनी एक प्रकारे प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला. ते म्हणाले की तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असून जनतेच्या अधिकारांवर गदा आणली जात आहे.
‘मूड ऑफ नेशन’च्या सर्वेक्षणानुसार लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात ३४ जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की, सत्ताधाऱ्यांविरोधात जनमत आहे असेच सर्व्हेमधून दिसत आहे. कर्नाटकमध्ये भाजप राहिल की नाही अशीच चिन्हे आहेत.
इंडिया टुडे आणि सी व्होटरनं यापूर्वी केलेली सर्वेक्षणे अचूक ठरली आहेत असं पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, त्यांनी विरोधकांच्या एकीवर भाष्य केले. ते म्हणाले की, विरोधकांच्या एकीचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, अजूनही कोणताही निर्णय या संदर्भात झालेला नाही. प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत, त्या अगोदर सोडवाव्या लागतील. विरोधकां एकीबाबत दिल्लीमध्ये डायलॉग सुरू होईल.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com