तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडीजचा पराभव

West Indies lost in the third ODI cricket match तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडीजचा पराभव हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

West Indies lost in the third ODI cricket match

तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडीजचा पराभव

भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत वेस्ट इंडिजचा ११९ धावांनी पराभव करत मालिका ३-० ने जिंकली.

पोर्ट ऑफ स्पेन: क्रिकेटमध्ये, काल रात्री पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल येथे भारताने वेस्ट इंडिजला १३७ धावांत गुंडाळत तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना ११९धावांनी जिंकला आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली. West Indies lost in the third ODI cricket match तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडीजचा पराभव हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News

भारतानं प्रथम फलंदाजी करत, ३६ षटकांत तीन बाद २२५ धावा केल्या, त्यानंतर पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला. पावसामुळे खेळात व्यत्यय येण्यापूर्वी भारताने २४ षटकांत १ बाद ११५ धावा केल्या होत्या. शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी अर्धशतक ठोकून भारताला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

पावसामुळे सामना दुसऱ्यांदा थांबला तेव्हा भारताने ३६ षटकांत ३ बाद २२५ धावा केल्या होत्या. भारताने झटपट विकेट गमावल्यानंतर शुभमन गिल ९८ धावांवर नाबाद फलंदाजी करत होता, तर संजू सॅमसन त्याच्यासोबत आला होता.

पाऊस थांबल्यावर पंचांनी डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे वेस्ट इंडीजला ३५ षटकांत २५७ धावांचं लक्ष्य दिलं. २५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव २६ षटकांत १३७ धावांवर आटोपला. पाहुण्यांसाठी युझवेंद्र चहलने चार, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी दोन गडी बाद केले. अक्षर पटेल आणि प्रसिद्ध कृष्णानेही एक-एक गडी बाद केला.

नाबाद ९८ धावा करणारा शुभमन गिल सामनावीर तसंच मालिकावीर पुरस्कारचा मानकरी ठरला.

दरम्यान, दोन्ही संघात उद्यापासून पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *