मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरे यांनी सहकारी पक्षांना विचारात घेतले नाही

Nationalist Congress Party President Sharad Pawar हडपसर मराठी बातम्या , Hadapsar News, Hadapsar Latest News

While resigning as Chief Minister, Uddhav Thackeray did not consider his fellow parties

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरे यांनी सहकारी पक्षांना विचारात घेतले नाही – शरद पवार

वैयक्तिक टीकाटिप्पणी करु नका

महाविकास आघाडीतल्या पक्षांची मानसिकता एकत्र काम करण्याची आहे

Sharad Pawar Senior Leader . Chief Nationalist Congress Party हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

नवी दिल्ली : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरे यांनी सहकारी पक्षांना विचारात घेतले नाही, त्यांनी सहकारी पक्षांना विचारात घ्यायला हवे होते असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

शरद पवार म्हणाले की, उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री दोन्ही पदे तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन संख्येच्या वरुन तयार झाली होती. यामध्ये तिन्ही पक्षाचा सहभाग होता. त्या संबंधित दुसरा निर्णय जर कोणी घेत असेल, राजीनामा देत असेल, त्यांचा अधिकार आहे. पण अन्य सहकारी पक्षांसोबत डायलॉग ठेवण्याची आवश्यकता होती. चर्चा न करता निर्णय घेण्याचा दुष्परिणाम होतात. त्यावेळी चर्चा झाली नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येऊ शकत नाही

जून २०२२ला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. तेव्हा हा राजीनामा देणे ही चूक होती, अशी भूमिका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही व्यक्त केली होती. पण पवारांनी त्याबद्दल अद्याप कोणतीही भूमिका व्यक्त केली नव्हती. ती आता त्यांनी मांडली आहे.

नवी दिल्लीत ते एका खासगी मुलाखतीत बोलत होते. आघाडीचं एकत्र सरकार स्थापन झालेलं असताना राजीनामा देण्यापूर्वी सहकारी पक्षांसोबत चर्चा न करता निर्णय घेण्याचे दुष्परिणाम होतात,असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी अदानी प्रकरणात जेपीसी, पहाटेचा शपथविधी, फडतूस-काडतूसवरुन रंगलेलं राजकारण यासह विवित मुद्द्यांवर भाष्य केलं.

वैयक्तिक टीकाटिप्पणी करु नका, असे पवार म्हणाले. मला जो महाराष्ट्र माहित आहे, जी संस्कृती माहित आहे, जनतेची मानसिकता माहित आहे, अशा गोष्टी शक्यतो टाळा. वैयक्तिक हल्ला नको, राजकीय विषय घ्या, लोकांचे विषय घ्या, त्यावर आक्रमक व्हा, परंतु वैयक्तिक हल्ला, चिखलफेक ही स्थिती येता कामा नये. हे टाळण्याचे काम जाणीवपूर्व केले पाहिजे, असा सल्ला पवारांनी दिला.

अदानी प्रकरणात जेपीसीच्या विषयी शरद पवारांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील खदखद अधिक तीव्र झालेली आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. अदानीप्रकरणी जेपीसीची आवश्यकता नाही, असे मत शरद पवारांनी व्यक्त केल्यानंतर महाविकास आघाडीत खळबळ उडाली होती.

महाविकास आघाडीतल्या पक्षांची मानसिकता एकत्र काम करण्याची आहे, तोपर्यंत आपल्याला काळजी नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *