संविधानाची जबाबदारी ज्यांच्यावर असते, त्यांनी त्याचं पावित्र्य राखण्याची जबाबदारीही घ्यायला हवी

Nationalist Congress Party President Sharad Pawar हडपसर मराठी बातम्या , Hadapsar News, Hadapsar Latest News

Those who are responsible for the Constitution should also take responsibility for maintaining its sanctity – Sharad Pawar

संविधानाची जबाबदारी ज्यांच्यावर असते, त्यांनी त्याचं पावित्र्य राखण्याची जबाबदारीही घ्यायला हवी – शरद पवार

सत्तेचा गैरवापर सातत्यानं केला जात असून, आपण त्या विरोधात लढणार

संविधानात राज्यपाल ही एक संस्था असून, त्याची अप्रतिष्ठा कशी केली जाते याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्रानं पाहिल

पवारांनी विरोधकांचा चेहरा बनावे; नितीशकुमारांचा आग्रहSharad Pawar's decision to quit the post of NCP President राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्याचा शरद पवार यांचा निर्णय हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

मुंबई : संविधानाची जबाबदारी ज्यांच्यावर असते, त्यांनी त्याचं पावित्र्य राखण्याची जबाबदारीही घ्यायला हवी, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आज मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. संविधानात राज्यपाल ही एक संस्था असून, त्याची अप्रतिष्ठा कशी केली जाते याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्रानं पाहिल्याचं ते यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आज सुप्रीम कोर्टाने निकाल देताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले. उद्धव यांनी राजीनामा दिला नसता तर पुन्हा सरकार आणलं असतं, अशी टिप्पणी केली. या टिप्पणीवर आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्धव यांच्या राजीनाम्याबाबत आता चर्चेला काहीच अर्थ नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, नैतिकता आणि भाजपाचा काही संबंध आहे, असं वाटत नसल्याची टीका पवार यांनी केली. सत्तेचा गैरवापर सातत्यानं केला जात असून, आपण त्या विरोधात लढणार असल्याचं ते म्हणाले. देशात लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता असून, विरोधकांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. सध्या मिळून काम करणं हे जास्त महत्वाचं असून, चेहरा नंतर ठरवला जाईल अशी आपली भूमिका पवार यांनी स्पष्ट केली.

पवारांनी विरोधकांचा चेहरा बनावे; नितीशकुमारांचा आग्रह

देशात भाजप जे काही करीत आहे, त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. त्यांना रोखण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. त्यातच देशाचे कल्याण होणार असल्याचा दावा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केला. त्यानंतर त्यांनी देशातील विरोधकांचा चेहरा शरद पवारांनी बनावे, असा आग्रहही धरला.

देशात भाजप विरोधात तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी सर्व विरोधक एकत्र येत आहेत. त्यासाठी बिहाराचे मुख्यमंत्री नितीशकुमार विरोधकांची मोट बांधत आहेत. त्यापूर्वी कुमार यांनी ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे. आता ते मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

नितीशकुमार म्हणाले, भाजपच्या कारनाम्यांमुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. लोकशाही टिकविण्यााठी भाजपला रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी विरोधकांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यावरच उद्धव ठाकरे आणि शरद पवार व इतरांशी चर्चा झाली आहेत. त्यावेळी सर्व नेत्यांनी सहमती दर्शविली आहे. आता आम्ही सर्वजण एकत्र लवकरच बैठक घेणार आहोत. त्यानंतर होणाऱ्या गटाचे नावही ठरेल.

पवार यांनी राजीनामा मागे घेतल्याचा आनंद झाल्याची भावनाही यावेळी व्यक्त केली. नितीशकुमार म्हणाले, “देशात लोकशाही टिकविण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यातच पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या निर्णयाने दुःख झाले होते. आता त्यांनी राजीनामा मागे घेतल्याने आनंद द्विगुणीत झाला आहे. त्यामुळे आता पवार यांनी विरोधकांचा चेहरा बनावे.”

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *