विधान परिषद निवडणुकीतल्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात

Elections हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News. Hadapsar News

With 11 candidates in the fray for 10 seats in the Legislative Council elections, Sadabhau Khot and Shivajirao Garje withdrew their applications.

विधान परिषद निवडणुकीतल्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात

सदाभाऊ खोत आणि शिवाजीराव गर्जे यांचे अर्ज मागे घेतले

मुंबई : राज्यातल्या विधान परिषद निवडणुकीत १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव गर्जे आणि भाजपा समर्थित अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळं आता भाजपाचे ५ आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी २ उमेदवार रिंगणात आहेत. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या २० तारखेला मतदान होणार आहे.Elections Results हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News. Hadapsar News

राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे नाईक-निंबाळकर आणि एकनाथ खडसे रिंगणात आहेत. भाजपाकडून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांनी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसच्यावतीनं मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे रिंगणात आहेत. तर शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्तारूढ पक्षानं प्रयत्न केला होता. यासंदर्भात माझ्याशी चर्चा केली होती. पण काँग्रेसनं दोन्ही उमेदवारांवर ठाम राहण्याचा निर्णय झाल्यानं ही निवडणूक होत असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. भाजपाचा ५ वा उमेदवार निवडून येणं कठीण असलं तरी ही जागा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेसचे विधीमंडळ पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीचे सर्व ६ उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. मतदानाची रणनीती ठरवण्यावर घटक पक्षांशी चर्चा झाली. त्यात काँग्रेसचा उमेदवार मागे घेण्याचा मुद्दा नव्हता, असं त्यांनी सांगितलं.

भाजपानं घटक पक्षांना खूप काही दिलं आहे. पण राजकारण करणं हा आपला प्रांत नसून, सामान्य माणसासाठीची लढाई कायम ठेवणार असल्याची प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी अर्ज मागे घेतल्यावर दिली.

मनसेच्या आमदारानं पाठिंबा द्यावा यासाठी भाजपाचे उमेदवार प्रसाद लाड यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *