Workshop on Digital and Social Media Marketing
डिजिटल व सोशल मीडिया मार्केटिंग कार्यशाळा
पुणेः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागातर्फे सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध विषयांवरील अल्पकालीन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत डिजिटल व सोशल मीडिया मार्केटिंग कार्यशाळा दोन शनिवार आणि दोन रविवार अशी चार दिवस (८,९, १५, १६ ऑक्टोबर) दररोज संध्याकाळी पाच ते आठ या वेळात फर्गसन रस्त्यावरील रानडे इन्स्टिट्यूट परिसरात विभागाच्या सभागृहात होणार आहे.
डिजिटल मार्केटिंग या विषयातील तज्ज्ञ स्वप्निल नरके कार्यशाळेत मार्गदर्शन करणार असल्याची माहिती संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख डॉ.उज्वला बर्वे यांनी दिली.
डॉ.बर्वे म्हणाल्या, कार्यशाळेसाठी रू. २००० शुल्क असून १२ उत्तीर्ण झालेली कोणतीही व्यक्ती प्रवेश घेऊ शकते. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर एका तुकडीत फक्त वीस जणांना प्रवेश दिला जाईल. सहभागींना उपस्थितीचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
विद्यापीाठाच्या संकेतस्थळावर https://events.unipune.ac.in/ इथे कार्यशाळेचा प्रवेश अर्ज उपलब्ध आहे. पॉडकास्ट निर्मिती, मोबाईल व्हिडिओ मेकिंग यांसंबंधीच्या कार्यशाळा मागील दोन महिन्यांत आयोजित करण्यात आल्या होत्या त्यांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असेही डॉ.बर्वे यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी या क्रमांकावर ८४०८०५७८९२ संपर्क साधावा.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com