World Antimicrobial Awareness Week at SPPU
विद्यापीठातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे प्रतिजैविक जागरूकता सप्ताह
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागात १८ ते २४ नोव्हेंबर २०२२ दरम्यान ‘जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
जगात प्रतिजैविक प्रतिकाराबाबत जागृती निर्माण करण्यासाठी जागतिक प्रतिजैविक जनजागृती सप्ताह पाळण्यात येतो. या सप्ताहाच्या निमित्ताने प्रतिजैविकांच्या आवश्यक वापराबाबत जनजागृती केली जाते. या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संशोधक, आरोग्य क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी, औषध निर्माते, सामान्य नागरिक यांच्या मध्ये याबाबत जनजागृती करण्यात येते.
याचाच एक भाग म्हणून विद्यापीठात या विषयावरील विविध स्पर्धा, प्रश्नमंजुषा आणि तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन आदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांना त्यांचे या विषयातील ज्ञान विस्तारण्याची संधी मिळेल.
विद्यापीठातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी यांना या कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे सूक्ष्मजीवशास्त्रच्या विभाग प्रमुख डॉ. करिश्मा परदेसी व या कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. सुरेखा सातपुते यांनी सांगितले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com