World Consumer Day will be organized on Tuesday 15th March
जागतिक ग्राहक दिनाचे आयोजन मंगळवार १५ मार्च रोजी
पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात तसेच तालुका पातळीवर मंगळवार १५ मार्च रोजी जागतिक ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील योजना व तक्रार निवारणाबाबत प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.
ग्राहकांमध्ये जागृतीच्यादृष्टीने वस्तू व सेवा खरेदी करताना दर्जा तसेच वजनमापांमध्ये होणाऱ्या फसवणूकीपासून सावधानता बाळगण्याबाबत संदेश तसेच ग्राहक हक्कांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी, ग्राहकांच्या जबाबदाऱ्या, कर्तव्ये याबाबतचे संदेश व माहिती देणारे विविध शासकीय कार्यालयांचे स्टॉल्स यावेळी उभारण्यात येणार आहेत.
लोककला व पथनाट्याचे सादरीकरणही यावेळी करण्यात येणार आहेत.