World Intellectual Property Day was celebrated at Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘जागतिक बौद्धिक संपत्ती दिन’ साजरा
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डिजाइन इनोव्हेशन सेंटरतर्फे जागतिक बौद्धिक संपत्ती दिनी विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते.
दरवर्षी २६ एप्रिल हा दिवस जागतिक स्तरावर जागतिक बौद्धिक संपत्ती दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक बौद्धिक संपत्ती संघटनेने (WIPO) २००० साली मध्ये पेटंट्स, ट्रेडमार्क आणि डिझाइन आदी बाबींचा सामान्य व्यक्तीच्या जीवनावर कसा परिणाम होतो याची जाणीव जागृती निर्माण करण्याचे आवाहन केले होते.
या दिवसाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डिझाइन इनोव्हेशन सेंटर (DIC) आणि इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन केले होते. या परिसंवादाचा विषय बौद्धिक ‘स्वामित्व हक्क आणि व्यावसायिकीकरण’ या विषयवार विनायक काटकळंबेकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. विनायक काटकळंबेकर हे टाटा मोटर्स लिमिटेड पुणे येथे उपमहाप्रबंधक (Deputy General Manager and IPR Lead) म्हणून कार्यरत आहेत. यावेळी कार्यक्रमासाठी डिझाइन इनोवेशन सेंटर चे समन्वयक प्रा. (डॉ.) अरविंद शाळीग्राम यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमासाठी विविध स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला या कार्यक्रमासाठी जवळपास ३५० हून अधिक व्यक्ती ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com