जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ -एमव्ही गंगा विलास रवाना

Ganga Vilas' is the longest river cruise in the world गंगा विलास’ ही जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

World’s longest river cruise – MV Ganga Vilas flagged off in Varanasi

पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वाराणसीमध्ये जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ – एमव्ही गंगा विलासला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले

जलमार्गाने वाहतुकीसाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांमुळे देशाच्या पूर्व भागात विकासाला चालना मिळेल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्‍ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे वाराणसी येथे जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ-एमव्ही गंगा विलासला हिरवा झेंडा दाखवला आणि टेंट सिटीचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात त्यांनी 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अन्य देशांतर्गत जलमार्ग प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी देखील केली.Ganga Vilas' is the longest river cruise in the world गंगा विलास’ ही जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

रिव्हर क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी पंतप्रधान करत असलेल्या प्रयत्नांच्या अनुषंगाने, या सेवेच्या प्रारंभामुळे आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेली रिव्हर क्रूझची प्रचंड क्षमता वापरात येईल आणि भारतासाठी रिव्हर क्रूझ पर्यटनाच्या नव्या युगाचा प्रारंभ करेल.

आज काशी ते दिब्रुगढ या सर्वात लांब रिव्हर क्रूझचा प्रारंभ होत असून यामुळे उत्तर भारतातील पर्यटनस्थळे जगाच्या पर्यटन नकाशावर येतील याकडे त्यांनी लक्ष वेधले. आज वाराणसी, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहार, आसाम येथे 1000 कोटी रुपयांच्या इतर प्रकल्पांचे राष्ट्रार्पण होत आहे ,यामुळे पूर्व भारतातील पर्यटन आणि रोजगार क्षमतांना चालना मिळेल असे ते म्हणाले.

जलमार्ग वाहतूक क्षेत्रात गेल्या काही वर्षांमधे प्रचंड वाढ झाल्याचं सांगून ते म्हणाले की २०१४ मधे देशात केवळ ५ जलमार्ग होते तर आता १११ मार्गांवरुन पाण्यावरची वाहतूक चालते. गंगा ही केवळ नदी नसून देशाच्या विकासाची साक्षीदार आहे असं ते म्हणाले. या जलविहाराचे पहिले मानकरी ठरलेल्या स्विस पर्यटकांचं त्यानी स्वागत केलं.

नदीतून सर्वात दूरवर प्रवास करणारी ही नौका आहे. गंगा विलास नौका ५१ दिवसांच्या प्रवासात उत्तर प्रदेश, बिहार, बांगलादेश आणि आसाममधून जाणार आहे. परदेशी पर्यटकांना देशातल्या सृष्टीसौंदर्याचं दर्शन घडवणं हा देखील ही नौका फेरी सुरू करण्याचा उद्देश आहे. सुमारे ३२ हजार किलोमीटरचा हा प्रवास भारत आणि बांगलादेश मधून वाहणाऱ्या लहानमोठ्या २७ नद्यांच्या पात्रातून होणार आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *