Appeal to members of Yashwant Cooperative Sugar Factory to collect election funds
यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना निवडणूक निधी जमा करण्याचे आवाहन
सर्व सभासदांनी ना परतावा स्वरूपात स्वेच्छेने १५ मे पर्यंत निवडणूक निधी जमा करण्याचे आवाहन
पुणे : यशवंत सहकारी साखर कारखाना मर्यादित, चिंतामणीनगर, थेऊर च्या सर्व सभासदांनी ना परतावा स्वरूपात स्वेच्छेने १५ मे पर्यंत निवडणूक निधी जमा करण्याचे आवाहन प्रशासकीय समितीचे अध्यक्ष संजय गोंदे यांनी केले आहे.
कारखान्याच्या ११ मार्च रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सभासदांनी कारखान्याची निवडणूक घेण्यासाठी ना परतावा म्हणून स्वेच्छेने वर्गणी स्वरूपात निवडणूक निधी जमा करण्याचा ठराव सर्वानुमते संमत केला आहे.
त्या अनुषंगाने सभासदांनी बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा- लोणी काळभोर, खाते क्रमांक २००५१६०००४४, आयएफएस कोड- एमएएचबी००००१३१ या खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एनइएफटी/आरटीजीएसद्वारे किंवा अकाऊंट पेयी धनादेशाद्वारे वर्गणी भरणा करावा व तपशील पुराव्यासह प्रशासकीय समितीच्या कार्यालयात जमा करावा. वर्गणी भरणा करताना तपशीलात सभासदाचे नाव नमूद करावे.
मयत सभासदांच्या बाबतीत त्यांच्या वारसदारांनी सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या मृत्यूच्या दाखल्यासह आवश्यक कागदपत्रे अध्यक्ष, प्रशासकीय समिती, यशवंत सहकारी साखर कारखाना मर्यादित, चिंतामणीनगर, थेऊर, कार्यालय- प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे विभाग, पुणे, साखर संकुल, पहिला मजला, शिवाजीनगर, पुणे- ४११००५ येथे सादर करावीत, असेही कळविण्यात आले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com