Yogi Adityanath meets Prime Minister in New Delhi
योगी आदित्यनाथ यांनी प्रधानमंत्र्यांची नवी दिल्लीत घेतली भेट
नवी दिल्ली : उत्तरप्रदेशचे काळजीवाहू मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या यशानंतर योगी आदित्यनाथ यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा होता. प्रधानमंत्र्यांनी योगी यांचं अभिनंदन केलं.
मुख्यमंत्री योगी यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये जनतेच्या आकांक्षांची पूर्ती करण्यासाठी अविश्रांत प्रयत्न केले असून आगामी काळात ते राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जातील, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी ट्विटरवरून दिलेल्या संदेशात व्यक्त केला आहे.
योगी यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि भाजपाचे संघटन महासचिव बी. एल. संतोष यांचीही आज भेट घेतली.
403 सदस्यीय विधानसभेत भाजपने 255 जागा जिंकल्या, तर त्यांचे दोन सहयोगी अपना दल (सोनेयलाल) 12 जागा जिंकल्या आणि निषाद पक्षाने विधानसभा निवडणुकीत सहा जागा मिळवल्या.