Programs like Yuva Samvad 2047′ should be held across the state
युवा संवाद २०४७’ सारखे कार्यक्रम राज्यभर व्हावेत
-चंद्रकांतदादा पाटील
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना संचालकांची राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न
पुणे : आपण नुकताच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला परंतु स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे वाटचाल करताना युवकांमध्ये वक्तृत्व व नेतृत्वाचा विकास व्हावा त्यांच्यामध्ये राष्ट्र प्रेमाची भावना निर्माण व्हावी यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलेल्या पंच तत्त्वांची माहिती युवकांना व्हावी यासाठी युवा संवाद २०४७ सारखे कार्यक्रम राज्यभर होण्याची आवश्यकता आहे, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय कक्ष, महाराष्ट्र शासन, मुंबई व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक १२ एप्रिल २०२३ रोजी संत ज्ञानेश्वर सभागृहात महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना संचालक तथा समन्वयकांची एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी चंद्रकांतदादा पाटील हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी भूषवले. यावेळी कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, क्षेत्रीय संचालक, राष्ट्रीय सेवा योजना पुणे डी. कार्तिकेयन, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या कार्यशाळेत जी -२० व युवक, युवा संवाद २०४७ आयोजन, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम आधिकारी राज्यस्तरीय कार्यशाळा,पी. एफ. एम. एस कार्यप्रणाली निधीवितरण व खर्च अशा महत्त्वपूर्ण विषयावर चार सत्रांमध्ये चर्चा केली गेली.
डॉ.कारभारी काळे म्हणाले, भारताच्या भविष्याच्या दृष्टीने युवक हा महत्वाचा घटक आहे. या युवकांना दिशा देण्याचे काम आपण या युवा संकल्प कार्यक्रमातून देत आहोत.
राजेश पांडे यांनी महाविद्यालय स्तरावर व विद्यापीठ स्तरावर युवा संवाद २०४७ आयोजित करून युवकांना प्रोत्साहन द्यावे अशी भूमिका मांडली. डॉ.संजय चाकणे यांनी राज्यस्तरीय कार्यक्रमाधिकारी कार्यशाळेच्या आयोजनासंदर्भात मार्गदर्शन केले. डॉ. कार्तिकेयन यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध योजना युवा संवाद या संदर्भात मार्गदर्शन केले. मंगेश खैरनार यांनी पी एफ एम एस या संदर्भातील सर्व शंकांचे निरसन व मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचे संचालक उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. रामेश्वर कोठावळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ. प्रभाकर देसाई यांनी मानले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com