BA, B Com admissions of open and distance learning schools of the university have started
विद्यापीठाचे मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशालेचे बीए, बीकॉम चे प्रवेश सुरू
नोकरदारांना आणि ज्यांना नियमित वर्गात येणे शक्य नाही अशांना शिक्षण घेणे सोपे
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशालेतर्फे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या कला व वाणिज्य शाखेचे पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला १० ऑगस्ट पासून सुरुवात करण्यात आली आहे.
बी.ए आणि बी.कॉम या दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया मंगळवार दिनांक १० ऑगस्ट २०२२ पासून सुरू झाली आहे. प्रशालेच्या http://unipune.ac.in/SOL या संकेस्थळावर जात विद्यार्थ्यांनी यासाठी ऑनलाईन नोंदणी करायची आहे.
ऑनलाईन नोंदणीसाठी अंतिम तारीख २९ सप्टेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत तर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर सायंकाळी ५ पर्यंत आहे.
भरलेल्या अर्जाची प्रिंट म्हणजेच प्रवेश अर्ज अभ्यास केंद्रांवर विद्यार्थ्यांनी ३१ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ५ वाजेपर्यंत भरायचे आहेत, अशी माहिती विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकात जाहीर करण्यात आली आहे.
ज्यांना नोकरी करत शिकण्याची इच्छा आहे अशा नोकरदारांना या माध्यमातून पदवी घेता येते. तसेच सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना नियमित वर्गात येणे शक्य नाही अशांना यामुळे शिक्षण घेणे सोपे होते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “विद्यापीठाचे मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशालेचे बीए, बीकॉम चे प्रवेश सुरू”